स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २१ / १२ / २० २३) :

सत्य बातमी करणाऱ्या पत्रकारांवरती इंदापूर मध्ये खोटे गुन्हे दाखल…!!

इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गेला काही दिवसांपूर्वी एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले होते .सदर घटनेची सत्य बातमी इंदापूर मधील जबाबदार पत्रकारांनी केल्याने त्यांच्यावरती इंदापूरचे पोलीस निरीक्षक यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे.जर एखादी घटना सत्य असताना, एका जबाबदार लोकप्रतिनिधीने/खासदाराने तक्रार करूनही जर पुणे ग्रामीण ची पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे कारवाई करत नसतील तर नेमकं त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच पाठबळ आहे. त्यामुळे अंकित गोयल यांना तातडीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरून बाजूला करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव ॲड राहुल मखरे यांनी इंदापूर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

या वेळी ॲड राहुल मखरे म्हणाले की इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये,इंदापूर पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडच्या आतील बाजूला, पोलीस स्टेशनच्या मुख्य कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस एका महिलेने काही दिवसांपूर्वी स्वताला पेटवून घेतले होते. मात्र पोलिसांनी सदर महिलेने पोलीस स्टेशन आवाराच्या बाहेरील पेटवून घेतल्याचा खोटा पंचनामा केला आहे.

तसेच सदर घटनेच्या खऱ्या, सत्य बातम्या काही पत्रकारांनी सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केल्या होत्या. ज्या महिलेने पेटवून घेतले त्या महिलेचा एक व्हिडिओ असून त्यामध्ये त्या महिलेने स्पष्ट सांगितले आहे की मी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पेटवून घेतले आहे. परंतु पोलिसांनी असा का पंचनामा केला की त्यांनी सदरची घटना पोलीस स्टेशनच्या बाहेर बाबा चौक ते डॉक्टर कदम यादरम्यानच्या पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला झाल्याची दाखवली आहे.

मात्र, सदर रोडवरील सर्व लोकांकडून आम्ही माहिती घेतली त्यावेळी समजले की अशी कोणतीही घटना सदर रोड वरती झाली नाही. कोणत्याही महिलेने रस्त्यावरती स्वतःला पेटवून घेतले नाही असे लोकांकडून स्पष्ट झाले आहे. परंतु, सदर घटना स्थळाचे काही पत्रकारांनी व्हिडिओ व फोटो काढलेले असून सदरची घटना पोलीस स्टेशनच्या आवारातील पाठीमागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ झालेली आहे.

ज्या ठिकाणी महिलेने स्वतःला पेटवून घेतले त्या ठिकाण च्या खुणा, निशाणी स्पष्टपणे दिसत आहेत. पत्रकारांनी बातमी दिल्यावर इंदापूरच्या पोलीस निरीक्षकांनी सदर पत्रकारांवरती खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामध्ये स्वतः इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तक्रारदार आहेत.तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना इंदापूर पोलीसांनी घटनास्थळ बदलण्याची तक्रारी दिलेली आहेत. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात आवाज उठवलेला आहे. परंतु पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना कोणत्या प्रकारचा अहंकार आहे की एका लोकप्रतिनिधीने तक्रार करूनही अंकित गोयल हे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत.

त्यामुळे माझी सोशल मिडिया व माध्यमांच्या माध्यमातून विनंती आहे की अंकित गोयल या पोलीस अधीक्षकांना पहिल्यांदा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक या पदावरून बाजूला केले पाहिजे.जर एखादी घटना खरी असताना, एका जबाबदार लोकप्रतिनिधीने/खासदाराने तक्रार करूनही जर पुणे ग्रामीण ची पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यावरती कारवाई होत नसेल तर नेमकं त्यांना फडणवीसांचेच पाठबळ असावे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तात्काळ अंकित गोयल यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲड राहुल मखरे यांनी केली आहे