स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २० / १२ / २०२३ ) :ग्रामदैवत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत .चांदशाहवली बाबांचा 459 उरूस शरीफ आज वार बुधवार दिनांक 20/12/2023 रोजी गल्लफ शेरा व संदलची शाही मिरवणूक .
बाबांचा गल्लफ व फुलांचा शेरा यांचा मान इंदापूर पोलीस स्टेशनला आहे. व परंपरेनुसार संदल बनवण्याचा मान हमीदभाई आत्तार यांच्या घराण्याकडे आहे . हाजी मुनीर कुरेशी व बन्सी भंडलकर यांना झेंड्याचा मान आहे. आज उरुसाचा पहिला दिवस. सायंकाळी सात वाजता इंदापूर पोलीस स्टेशन मधून गल्ला शेऱ्याची मिरवणूक मेन रोड नेहरू चौक येथे हमीद भाई यांच्या घराजवळ येऊन संदल घेऊन पुढे दर्ग्याजवळ मिरवणुकीची सांगता होते नंतर सायंकाळी आठ तीस वाजता समस्त गावकरी आणि बाबांचे भक्त यांच्या उपस्थितीमध्ये विधीवत फातेखाने होऊन, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे ; प्रकाश माने , महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव महिला पोलीस हवालदार बिडवे मॅडम , खंडागळे मॅडम, भोंग मॅडम, अमोल गायकवाड पोलीस हवालदार रासकर काळे साहेब, यांच्या उपस्थितीत आणि व कर्मचारी वर्गयांच्या हस्ते, उरूस कमिटी चे अध्यक्ष आझाद पठाण, उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर, प्रमुख मानकरी हमीदभाई आत्तार, ट्रस्टी महमूद मुजावर, मुनीर मुजावर, अजूम पठाण , अल्तमस शेख, अमीन पठाण, सलमान पठाण, अन्सार शेख, मुनीर पठाण इ . उपस्थीतहोते .