स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३० / ११ / २० २३) :
इंदापूर : दि. ३० नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ९ डिसेंबर रोजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महामेळावा होणार आहे. त्या मेळाव्याच्या नियोजनाच्या मीटिंगमध्ये इंदापूर तालुक्यातील ओबीसी समाजातील सर्व जातीतील लोकांना प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याचे ठरले. व तसेच प्रत्येक जातीतील तरुणांना स्वयंसेवक म्हणून नेमण्याचे ठरले. ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक गावोगावी जाऊन घोंगडी बैठका घेऊन कार्यक्रमाला येण्यासाठी ओबीसी समाजाला आव्हान करण्याचे ठरले. व ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान इंदापूर तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित पांडुरंग शिंदे, अडवोकेट कृष्णाजी यादव, देवराज जाधव, शशिकांत तरंगे, आप्पा माने, पोपट पवार, बाळासाहेब व्यवहारे, रमेश राऊत, मच्छिंद्र चांदणे, वसंत मोहोळकर, नानासाहेब खरात, अतुल झगडे, लक्ष्मण देवकाते, अवधूत पवार, पप्पू पवार, तानाजी धोत्रे, तुकाराम करे व इतर मान्यवर उपस्थित होते.
