स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / ११ / २० २३) :

आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अनिल (आण्णा) पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त इंदापूर शहरांमध्ये भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूरचे  तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार , सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार ,वैद्यकीय सेवेतील नामवंत डॉक्टर मिलिंद खाडे, रोहिदास थोरवे, इंदापूर क्रिटीकेअर सेंटरचे गोरख भोसले , डॉ. मगर, डॉ. लहुजी कदम, अॅड .तानाजीराव देवकर तसेच सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा साहित्य ,क्षेत्रातून विविध मान्यवर  तसेच  आजी माजी नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग, आमचे मेंबर परिवाराचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना इंदापूरचे तहसीलदार म्हणाले की, वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत, कोणी अनाठायी खर्च करून करतात, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात , पण आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर , सामाजिक उपक्रम अभिष्टचिंतन (वाढदिवसाच्या)दिवशी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध आणि रक्तातच गुण लागतात. २०१६ पासून मी इंदापूर येथे प्रशासकी अधिकारी म्हणून काम करत आहे. तेव्हापासून पाहत आहे की, कधीही, केव्हा ही काळ्यारात्री  हाक दिल्यास त्या हाकेला उभा राहणारा युवक म्हणून आण्णांची ओळख आहे. खूप कमी लोक असतात ते आपल्या कार्याने, आपल्या वागण्याने प्रसिद्ध असतात.

आपला माणूस म्हणून आपल्या समाजाचे भलं व्हावं म्हणून सदैव पुढे असतात . विविध राजकीय पक्ष  सन्मान करतात. सर्वांचं कल्याण हो अशी भावना ठेवणारा,प्रामाणिकपणाने काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे आणि प्रशासनाला अशा माणसाची गरज असते. प्रशासकीय अधिकारी सुद्धा माणूसच असतो. ज्यावेळेस चांगली माणसं , आणि प्रशासन चांगल्या प्रश्नासाठी एकत्र येतात तेव्हा समाजासाठी चांगले काम करतात.आमचे  मेंबर परिवाराने जो उपक्रम हाती घेतला तो गौरविण्यात करण्याजोग आहे. आण्णांचे भविष्य उज्वल आहे.

गोरगरिबासाठी प्रामाणिक काम करणारा माणूस म्हणून आण्णाची ओळख आहे. प्रशासन सदैव आण्णांच्या  चागल्या कामासाठी पाठीशी असते. प्रशासनाची कुठल्याही अडचणीला किंवा गोरगरीचा अडचणीला धावून जाणारा माणूस आहे अशा शब्दात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, अनिल (आण्णा)  पवार यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिलेला आहे. समाजापुढे आदर्श ठेवणारा तरुण म्हणून अनिल (आण्णा) पवार यांची ओळख आहे . विविध राजकीय पक्षातील नेते वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करणे, हॉटेलवर युवकांना वेगळ्या पद्धतीने पार्टी देणे,  अनाठायी खर्च करून युवकांना वेगळ्या प्रकारचे संस्कार करत असतात. पण आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल (आण्णा) पवार यांनी  आपल्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त या सर्वाला बगल देत समाजासाठी, समाजाचे हित जपण्यासाठी ,समाजाचे काहीतरी देणे लागतो आपण, समाजासाठी काहीतरी करावे म्हणून आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. खरंच समाजापुढे आताच्या युवकापुढे एक आदर्श ठेवला आहे.वेळ प्रसंगी सर्वसामान्य समाजाच्या समस्यासाठी स्वतःवर गुन्हे सुद्धा दाखल करून घेणारा तरुण आहे. अशा युवकाचा  आदर्श घ्यावा .आण्णा सर्वाच्या सुखदुःखात, कुठलाही  कोणाच्याही अडचणीला धावून जाणारा म्हणून आण्णा ह्या टोपण नावाने आणि आपले मेंबर या नावाने त्याची ओळख आहे. प्रशासन सदैव आण्णाच्या पाठीशी असेल असेही यावेळेस पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले.

या प्रसंगी बोलताना वैद्यकीय सेवेतील नामवंत डॉक्टर मिलिंद खाडे म्हणाले,  अनेक जण राजकारणात पराभव  झाल्यानंतर समाजसेवा, राजकारण सोडून देतात पण कुठलेही पद नसताना , नगरसेवक निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभव झाला म्हणून काम सोडलं नाही. पेटून उठला आणि समाज असो, इतर असो, कुणी परका असो, आपला असो,  वंचित असो अशा सर्वांच्या कामासाठी सदैव पुढे धावत गेला म्हणूनच लोकांनी आपली मेंबर पदवी दिली. येणाऱ्या काळात आण्णांनी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदापर्यंत मजल मारावी असे डॉ .मिलिंद खाडे भावना व्यक्त केली .

यावेळेस आभार व्यक्त करताना अनिल पवार म्हणालेकी,  गेली अनेक वर्ष मी सामाजिक, राजकीय विविध क्षेत्रात काम करत असताना खूप मोठ्या मनाने हजारो, शेकडो लोक माझ्यावर प्रेम करतात, आपल्यासारखे अधिकाऱ्या माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देतात त्यामुळे मला काम करण्याची उमेद मिळते. निराधार महिला असतील, गरजू महिला असतील, त्यांना साडी वाटप, रक्तदान शिबिर घेऊन विक्रीमे रक्तदान. ह्या रक्तदान शिबिरातून अनेक गोरगरिबांना मी मोफत रक्तदान पुरवतो. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यिकीट देतो. असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस आहे. उपस्थित सर्वांचे आभार आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार आणि पदाधिकाऱ्यांनी मानले.

या रक्तदान शिबिरात ४८२ बॅग रक्त संकलन झाले असून ७०० च्या वरती नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला .

यावेळी मोठ्या संख्येने महिला जेष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक, युवक वर्ग, आजी माजी नगरसेवक ,आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय सेवातील डॉक्टर, सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, तसेच इंदापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने अनिल आण्णा पवार यांचा भव्य असा सत्कार करून अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला. यावेळी  इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पत्रकार क्षेत्रातील बुलंद आवाज, लेखणीचा ढाण्या वाघ म्हणून ओळख  असणारे निर्भीड पत्रकार, संपादक धनंजय कळमकर, काकासाहेब मांढरे,हमीदभाई आतार , सिद्धार्थ मखरे, आदित्य बोराटे, श्रेयश नलवडे आदी पत्रकार मंडळी उपस्थित होती.

हा कार्यक्रम व्यवस्थीत पार पाडण्या करीता आमचे मेंबर अनिल पवार मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले .

________