स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. ६ / ११ / २०२३ ) :

इंदापूर तालुक्यातील व इंदापूर शहरातील सामाजिक क्षेत्रात स्वताला झोकून दिलेल्या ध्येयवेडा युवक म्हणजे आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल (आण्णा) पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधून मोफत सर्व रोग निदान शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजनाचे हे तिसरे पर्व असून या निमित्ताने (दि.७) नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबिर सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत तसेच ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

आरोग्य शिबिरासाठी इंदापूर क्रेटिकेअर सेंटर- हृदय व सर्व रोग निदान ,डॉ. एल. एस. कदम हॉस्पिटल बाल रोग निदान, डॉ. मगर कृष्णदृष्टी नेत्र रुग्णाल मोतीबिंदू व नेत्र तपासणी, राधाकृष्ण हॉस्पिटल डॉ. राजापुरे अस्थिरोग निदान, कृष्णा हॉस्पिटल डॉ. वणवे अस्थिरोग निदान, स्मिअर पॅथालॉजी लॅब- मोफत निदान कार्ड वाटप, रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी करण्यासाठी वरील वैद्यकीय सेवेतील अनुभवी डॉक्टर व त्यांचे पथक उपस्थित असणार आहेत.

तसेच मोफत निदान कार्ड वाटप अकलूज, बारामती, पंढरपूर,माढा, कुर्डूवाडी, बार्शी, भिगवण, दौंड, करमाळा, नातेपुते, टेंभुर्णी निरोगी आरोग्य रोग तपासणीसाठी निदान कार्ड प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी या योजनेखाली विविध प्रकारच्या सवलती तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता. समाज प्रबोधनपर भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी हजारो नागरिक उपस्थित राहणार असेही आमचे मेंबर परिवाराच्या तर्फे सांगण्यात आले आहे.

विक्रमी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घडवून आणण्याचा आपले मेंबर परिवाराचा मानस.

मोठ्या संख्येने नागरिक व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून गेल्या वर्षी ही आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त ५०५ बॅग रक्त संकलन केले होते. तसेच १५१ महिलांना गरजू वस्तू व साडी वाटप केले होते. दहावी व बारावी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू किट भेट दिले होते. यावर्षीही विक्रमी रक्तदान घडवून आणण्याचा आमचे मेंबर परिवाराचा मानस असून अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत‌. तसेच अभिष्टचिंतन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर येणाऱ्या एक दोन महिन्यात आयुष्यमान भारत कार्ड, आबा कार्ड, रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती नाव वाढवणे असे विविध कार्यक्रम आमचे मेंबर परिवाराच्या वतीने आयोजित करण्याचा मानस आहे.

पिटूशेठ घोडके
आमचे मेंबर परिवाराचे सल्लागार, मार्गदर्शक

समाजासाठीव समाजसेवेसाठी तनमन झोकून देणाऱ्या युवकाच्या पाठीवर कौतुकाची समाजाने थाप टाकावी- अॅड .आत्माराम चौगुले

इंदापूर तालुका किंवा इंदापूर शहर असो आजुबाजूचे चार ते पाच तालुक्यातील कुठल्याही जाती-धर्माच्या नागरिक असो किंवा युवक, युवती असो किंवा महिला असो, पोलीस स्टेशनचे अडचणी असो, तहसील कार्यालय समस्या असो, कृषी विभाग असो की,पंचायत समिती इतर कुठलेही अडचण असो त्या अडचणीला धावून जाणारा समाजसेवेचा वसा हाती घेतलेला , सामाजिक कामासाठी झोकून देणारा ध्येयवेडा आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार सारख्या कार्यकर्त्यावर समाजातील, नागरिकांनी आणि समाजाने कौतुकाची थाप टाकावे.अशा युवकाच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्याला प्रोत्साहन देणे, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे .कुठल्याही अडचणीला धावून जाणारा युवक , आजी-माजी आमदार, नगरसेवक यांना आपलासा वाटणारा कार्यकर्ता, आपल्या घरातील वाटणारा सदस्य अशी ओळख अनिल पवार यांची निर्माण झाली आहे. कुठलेही पद, कुठलेही निवडणूक न लढवता मेंबर म्हणून इंदापूर तालुक्यातील जनतेने या युवकाला आमचे मेंबर पदवी दिली आहे .अशा या युवकाशी खंबीर पाठीशी उभे राहाणे काळाची गरज आहे.असे मत इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड.आत्माराम चौगुले यांनी व्यक्त केले.