स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १९ / ३ / २० २३) :

– पतंजली योग समितीचे प्रशिक्षक देणार योगाचे धडे
– राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर महाविद्यालयात होणार योग दिन साजरा
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर जागतिक योग दिनानिमित्त एकाच वेळी 2000 व्यक्ती सामूहिक योगासने करून योग दिन साजरा करणार आहेत.राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील या योग प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.पतंजली योग समितीचे प्रशिक्षक यावेळी शास्त्रोक्त योगाचे धडे देऊन योगास आपल्या जीवनामध्ये असलेले अनन्य महत्व सांगणार आहेत.
21 जून हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.भारतीय योगाचे असलेले महत्त्व ओळखून योग साधनाद्वारे निरोगी आरोग्य राखण्याचा प्रयत्न करण्यात येतो.दरवर्षी इंदापूर महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा केला जात असतो यावर्षी 21 जून रोजी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी इंदापूर महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये सहभागी होऊन योगाचे प्रशिक्षण घेणार आहेत.
योगाला आपल्या जीवनात असणारे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन या योग दिनाच्या आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
