1. स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. २० / ६ / २० २३ ):

आज दिनांक 20/ 6 /2023 रोजी इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित श्री रणछोडदास कल्याण दास शहा विद्यालय इंदापूर जिल्हा पुणे.येथे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी वर्गातील उपस्थिती वाढावी यासाठी आपण निरनिराळे उपक्रम राबवतो याच भावनेतून आपल्या शाळेत आज सौ. सुधा कौलगी प्रतिष्ठान इंदापूर. यांच्यावतीने आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती येथील प्रसिद्ध विधीतज्ञ अड. भगवानराव खारतोडे साहेब होते तसेच गुरुवर्य प्राध्यापक श्री दत्तात्रय कौलगी सर यांच्या शुभहस्ते गणवेश वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक श्री.कृष्णा ताटे सर तसेच इंदापूर अर्बन बँकेचे नवीन नियुक्त संचालक माननीय श्री. बबन शेटे साहेब हेही उपस्थित होते ,
प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री नलवडे साहेब,
आपल्या शाळेत परिसर हिरवागार करणारे वृक्षमित्र वासुदेव शिरसाट काका यांची उपस्थिती होती.
तसेच नाकोडा शेठ अंकुश काळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य, पालक , परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी हे उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अड. श्री. गिरीश शहा साहेब यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.