स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १३ / ५ / २० २३) :

अखेर शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाची प्रतीक्षा संपवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय .!!
– – – – – – – – – – – – – –
इंदापूर तालुक्यातील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलाच्या प्रश्ना बाबत आज संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये येणाऱ्या ५ जून पर्यंत निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या बिलाचा प्रश्न संपणार असल्याची माहिती निरा -भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांनी दिली आहे. ते आज इंदापूर अर्बन बँकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की निरा-भिमा साखर कारखान्याच्या ऊस बिलाचा प्रश्न बाबत आज संचालक मंडळाची बैठक झाली आहे. प्रामुख्याने या बैठकीमध्ये कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या बिलाच्या प्रश्न बाबत सखोल चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने असे सर्वांचे एक मत झाले की आम्ही आतापर्यंत तोडणी चे सर्व बिल दिले आहे. मात्र यामध्ये काही शेतकऱ्यांची उसाची बिले राहिले आहेत ते सर्व ५ जून च्या आत मध्ये दिले जाणार आहे. तसा आमच्या सर्वांचा निर्णय या बैठकीमध्ये झाला आहे.
जर ५ जून पर्यंत काही तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण झाल्यास त्यातूनही शंभर टक्के मार्ग काढला जाणार आहे. आम्ही या अगोदर १०/११ कोटी रुपये अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा केली आहेत. तसेच पुढेही १०/१५ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे ५ जून च्या आत मध्येच शेतकऱ्यांची सर्व उसाची बिले अदा केली जातील असे निरा-भिमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार म्हणाले.
यावेळी निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन कांतीलाल झगडे यांच्यासह सर्व संचालक मंडळातील संचालक उपस्थित होते.
