आज दिनांक 13/5/2023 रोजी डॉक्टर नीतू मांडके हॉल येथे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील सन 2006 -2007 शैक्षणिक वर्षातील इ. 10 तुकडी ग माजी विद्यार्थी, विद्यार्थिनीचा, व शिक्षक, यांचा स्नेह मेळावा आयोगित केला होता. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. कवी महादेव चव्हाण सर यांच्या देवमय काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची ओळख करून दिली, शिक्षकांचे सत्कार हार ट्रॉफी शाल, श्री स्वामी समर्थांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक मा.श्री. राहुल भोसले साहेब, यांनी आठवणीतील शाळा या कवितेचे गायन केले, संतोष नरूटे यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम केला . इयत्ता दहावी ग या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ याची ऑडिओ क्लिप दाखवण्यात आली जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या क्लिपने केले. ही चित्रफित्त पाहून सर्वच विद्यार्थी भारावून गेले. आपण 16 वर्षांपूर्वी कसे दिसत होतो हे त्यातून ओळखता आले, शिक्षकांच्या मनोगतात सुरुवातीला श्रीमती वणवे मॅडम यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. महादेव चव्हाण सर यांनी समाजाशी असलेले आपले संबंध त्यांना केली जाणारी मदत यातूनच आपण सुद्धा समाजाला मदत करत रहा अडचणीच्या वेळेस सामोरे जा, मनुष्य धर्मामध्ये एकमेकांना मदत करणे हे आपले कामच आहे त्यासाठी वेळ आणि पैसा याचा विचार करू नका असा मंत्र दिला.
या कार्यक्रमाला, शिक्षिका रुक्सार शेख ,सोनाली पवार, पल्लवी बनकर ,इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नंदू जाधव, श्रीकांत मखरे,स्वप्निल महाजन, पवन घनवट, दिनेश झगडे, सागर जाधव, प्रकाश फलफले, स्वप्निल पवार विक्रांत कुलकर्णी, मालक मोहसिन शेख, सौरभ नागपुरे, महेश पोतदार, नदीम बागवान, केशव व्यवहारे, सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष नरूटे यांनी केले. आभार सोनाली पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीकांत मखरे ,स्वप्नील महाजन यांनी, प्रयत्न केले
