स्टार केबी न्यूज
संपादक : काकासाहेब मांढरे इंदापूर (
दि.. १२ / १२ / २० २ २ )
: शहरात बेशिस्त दुचाकी पार्किंग केलेल्या वाहनावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिसांचे बेधडक कारवाईचे सत्र सुरू असल्यामुळे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. दोन दिवसापूर्वी एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडल्याने दुर्दैवी अंत झाल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली व बेशिस्त व भरधाव वेगाने जाणाऱ्या व पार्किंग करणाऱ्या वाहनधारकावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी पालक वर्गाबरोबरच शहरवासीय आक्रमक झाल्याने पोलिसांनी या बेशिस्त वाहनधारक व वाहनावर कारवाईचे अस्त्र उगारल्याने बेशिस्त वाहन पार्किंग केलेल्या वाहनधारकांचे चांगलीच पळापळ झाल्याचे पहावयास मिळाले.
आज (दि. १२) रोजी आय कॉलेज परिसरात बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी बेधडक कारवाई केली. या कारवाई मध्ये अनेक दुचाकी चार चाकी टेम्पो मध्ये भरून पोलीस स्टेशनला आणून रीतसर कारवाईची प्रक्रिया चालू आहे.
बेधडक कारवाईमुळे शहरातील बेशिस्त पार्किंग व्यवस्था काहीशी वटणीवर आल्याचे दिसत आह. यामुळे शहर सुटसुटीत व सुंदर दिसेल व होणाऱे संभाव्य अपघात टळतील असेही बोलले जात आहे. या बेधडक कारवाईमुळे लघु व्यावसायिक व पालक वर्ग व नागरिकांमध्ये
आजच्या कारवाईमध्ये वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे. अमोल खाडे, प्रवीण शिंगाडे, सुहास आरणे, पदमसिंह शिंदे यांनी सहभाग घेतला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
