इंदापूर तालुक्यातील वयोवृध्द माता आणि पिता यांची प्रवासातून होतेय हेळसांड शिवाय दलाला कडून फसवणुकीचा करावा लागतोय सामना.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या वयोवृध्द श्रद्धेय माता आणि पिता यांना एजेंट कडून फसविले जात आहे.
धड चालता येत नाही आणि बोलताही येत नाही तरीही शासनाची मिळणारी तुटपुंजी मदत बंद होऊ नये म्हणून उपाशी पोटी राहुन ह्या वयात करावा लागतोय सामना.
जिल्हाधिकारी यांनी जी संजय गांधी निराधार,आणि श्रावण बाळ योजनेसाठी जी उत्पंनाची अट घातली आहे ती श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांना वगळून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लागु करावी.
आणि श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना उत्पंनाच्या दाखल्या ऐवजी हयातीचा दाखल्याची अट द्यावी.
अन्यथा दिनांक 05 मे 2023 रोजी सबंधित वरीष्ठ अधिकारी यांचे निदर्शनास यावे यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपोषणास बसणार आहे.
कळावे
आपला विश्वासू
आयु.लोंढे एम बी
सचिव: इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी.
सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती.
