स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २१ / ४ / २० २३) :

जिजाऊ ब्रिगेड पुणे आणि लिनेस क्लब शहा, लिनेस क्लब कालठण यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे खास महिलांसाठी आयोजन जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.जयश्री गटकुळ यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
प्रथमच इंदापूर तालुक्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेली रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टी खास महिला भगिनींसाठी असल्याने आणि महिला भगिनींनी राबविलेला एक अनोखा उपक्रम आहे. रमजान ईद निमित्त शुभेच्छा देत येणाऱ्या महिला भगिनींचे स्वागत करत हिंदू मुस्लिम महिला भगिनी आणि लहान मुलींनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमानिमित्त जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. जयश्री गटकुळ, शहा लिनेस क्लबअध्यक्षा जयश्री खबाले, कालठण लिनेस क्लब अध्यक्ष रतन पाडूळे यांनी सर्व महिला भगिनींचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी प्रा भास्कर गटकुळ, नितीन पटेल, शिवाजी गटकुळ, अंकुशअप्पा पाडूळे, शंनो अशपाक तांबोळी,रुकसाना तांबोळी, फरीदा आतार, फिज्जा आतार, परवीन सय्यद तांबोळी, आतिका जावेद शिकलकर, कासिफा शिकलकर, सिमरन तांबोळी,कल्पना राऊत, मिनाक्षी जाधव, वैशाली गटकुळ राजश्री जगताप, वनिता राजपुरे, वर्षा पटेल, सुनिता पाडूळे, महादेवी बनसोडे, प्रियांका जाधव, दिपाली सोनवणे अन्य मान्यवर उपस्थित होते.