स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे  इंदापूर (दि.२/४/२३ ) :


जिल्हा नियोजन मंडळाची अलीकडे बैठक झालेली नसल्याने काही विकास कामांना मंजुरी नसताना, इंदापूरचे आमदार हे मागणी केल्याचे फक्त पत्र दाखवून रु. 3 कोटी रक्कमेची कामे मंजूर केल्याचे श्रेय घेण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत आहेत. सदरची कामे शिवसेना-भाजपचे युती सरकार मंजूर करणार व निधी देणार आहे. आता महाविकास आघाडीची सत्ता नसल्याने इंदापूरच्या आमदारांनी शिवसेना-भाजप सरकारच्या कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये, असे प्रत्युत्तर इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी शनिवारी दिले.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांतदादा पाटील हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकार हे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून विकास कामांना मंजुरी देते. त्यामुळे फक्त मागणी केल्याचे पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल करून व बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करून, फुकटचे श्रेय घेणे आमदारांनी आता बंद करावे. सत्तारूढ शिवसेना-भाजप सरकार हेच विकास कामांना निधी देणार असून, राष्ट्रवादीच्या आमदारांनी विकास कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये, असा टोलाही भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी लगावला.
———————————-