स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. ३१ / ३ / २० २३ ) :

इंदापूर-चे राष्ट्रवादी चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दि 29मार्च रोजी इंदापूर येथील सभेत बोलताना भाजप च्या 26 मार्च रोजीच्या सभेवर टिका करताना. भाजप ची सभा ही गुंडाची सभा होती. त्यात गुंडाची भाषणाला लोक टाळ्या वाजवतात अशा प्रकराची  केली. त्यामुळे पहिल्यांदा एक गोष्ट आम्ही स्पष्ट करतो की 26 मार्च ची सभा ही कोणाची व्यक्तिगत सभा नव्हती तर ती महाराष्ट्रातील सर्वात जास्त 106 आमदार असलेल्या सत्ताधारी पक्षाची सभा होती. या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बहुजन नेते आमदार गोपीचंद पडळकर, तालुक्याचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थित होते.या वेळी बोलताना
दीपक काटे प्रदेश सचिव भाजपा हे पत्रकार परिषदेत म्हणाले की,आमचा भरणे यांना प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या पक्षाच्या सभेला जर तुम्ही गुंडाची सभा किंवा गुंडाची भाषण म्हणतं असाल तर.. 29 तारखेला राष्ट्रवादी ची जी सभा झाली. ज्या राष्ट्रवादी चे भाजप पेक्षा निम्मेच आमदार आहेत त्या सभेला चोरांची सभा.. आणि कमिशन वाल्या चोरांची भाषण म्हणून संबोधयाला काय हरकत आहे. आणि त्यांना जर आमचा पक्ष गुंडांचा पक्ष वाटतो. आमच्या पक्षांचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा फोटो बॅनर वर टाकून स्वतःची जाहिरात करायचा केविलवाना प्रयत्न का केला …. विशेष म्हणजे आमच्या चंद्रकांत दादांचा फोटो हा न विचारता चोरून छापला हीच त्यांच्या पक्षाची संस्कृती आहे. एखाद्याच्या भाषणाला टाळ्या वाजवने हा काय इंदापूर करांचा गुन्हा आहे कार लोकांना आम्ही मांडलेले मुद्दे पटले म्हणून त्यांनी टाळ्या वाजवळ्या…. याचा अर्थ लोकांचा आता भाजपाला प्रतिसाद आहे… त्यामुळे आतां भरणेच्या पायाखालची वाळू सरकायाला लागलीय. त्यामुळे ते आता काहीपण वरळायला लागलेत. भरनेनी हे वक्तव्य करून आमच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांचा व सर्व उपस्थित मान्यवरांचा अपमान केला आहे. भरणे यांनी त्यांचं विधान माघारी घ्यावे अन्यथा त्यांना या अपमानाचे परिणाम भोगावे लागतील याची दखल घ्यावी. धर्माचे रक्षण करणं ही गुंडागिरी असेल, गोहत्या थांबावी म्हणून प्रयत्न करणे ही जर गुंडागिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही स्वाभिमानाने करू. टगेगिरी करणाऱ्या नेत्यांचे जोडे उचलून आमदारकी मिरवणाऱ्या आमदाराला काय धर्म स्वाभिमान कळणार आहे.आशी माहीती दीपक काटे प्रदेश सचिव भाजपा यांनी पत्रकार परिषदेत दिली,