स्टार केबी न्यज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २० / २ / २०२३ ) :

पतंजलि योग समिती आणि युवा भारत योग परीवाराच्या 21 हजार सुर्यनमस्काराने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात आले.. निरोगी,सशक्त बलशाली भारत निर्मितीसाठी मोफत योग प्राणायमचे वर्ग चालविणार्‍या योग परीवाराच्या वतीने सुर्यनमस्काराच्या संकल्पाची सुरवात आज पहाटे करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी इंदापूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे नगरसेवक अविनाश मखरे,शिवसेना प्रमुख महादेव सोमवंशी ,भारत स्वाभिमानचे अध्यक्ष जयकुमार शिंदे,पतंजलिचे अध्यक्ष मल्हारी घाडगे युवा भारत राज्य कमिटी सदस्य प्रशांत गिड्डे, महिला अध्यक्ष सायराभाभी आतार उपस्थित होत्या.

छत्रपती शिवरायांचे मन,मनगट आणि विचार बळकट होते म्हणुनच महाराजांनी स्वराज्य उभे केले .योगसाधनेद्वारे व्यक्ति निरोगी सशक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने नियमित सुर्यनमस्कार योग प्राणायम केला पाहिजे असे प्रतिपादन रामराजे कापरे यांनी व्यक्त केले.
आपल्या मधुर वाणीने जनमाणसाचे मन मोहित करणार्‍या सुत्रसंचालकांचा शिवजयंतीच्या निमित्ताने उत्कृष्ट निवेदक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सन्मानमुर्ती
रघुनाथ पन्हाळकर
अमर निलाखे
विजयकुमार फलफले
भारत फलफले
संतोष नरूटे
भास्कर जगताप
नितिन भोसले
सौ . माधुरी चव्हाण

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजलिचे पदाधिकारी बिभिषण खबाले,रामेश्वरजी साठे,आण्णा चोपडे,डाॅ विक्रम पोतदार,देवराव मते,बाजीराव शिंदे,किसन पवार,अभिजीत देवकर,हमीदभाई आतार यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचालन रविंद्र परबत यांनी तर आभार प्रदर्शन शरद झोळ यांनी केले.