स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १८ /९ / २०२५ )

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७

Oplus_16908288
/९ /२०२५ रोजी दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि अहमदनगर या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने वादविवाद स्पर्धेत अक्षय यादव आणि सायली मखरे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक-सुवर्णपदक मिळाले तसेच भारतीय वैयक्तिक गायन स्पर्धेत सरदार मुलाणी या विद्यार्थ्याला तृतीय क्रमांक-कांस्य पदक प्राप्त झाले तसेच ओंकार कदम या विद्यार्थ्याला तालवाद्य या प्रकारात द्वितीय क्रमांक-रौप्य पदक मिळाले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, कला विभाग प्रमुख डॉ. भरत भुजबळ, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, प्रा. प्रकाश करे प्रा. सचिन आरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.