प्रत्येक कुटुंबात एक तरी अधिकारी झाला पाहिजे !
– भिमसेन चव्हाण
कालठण – ( प्रतिनिधी ) प्रत्येक कुटुंबात एक तरी अधिकारी झाला पाहिजे असे मत सिने अभिनेता भिमसेन चव्हाण यांनी व्यक्त केले.
कालठण नं. १ गावचे सुपुत्र ॲड .गोविंद अर्जुन पाडुळे यांची लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे वतीने ग्रामदैवत श्री.काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजित जाहीर नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.
ऍड. गोविंद पाडुळे साहेब हे कालठण नं. १ गावातील पहिले विधितज्ञ झाले असून ते दुसरे पोलीस उपनिरीक्षक आहेत. गावातील अनेक तरुण पोलीस खात्यात विविध पदावर आपल्या गावाचे नाव उंचावत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
त्यामुळे गावातील होतकरू तरुणांनी फक्त प्रेरणादायी व्यक्तींचे अनुकरण करून गावातील प्रत्येक कुटुंबात एक तरी अधिकारी तयार झाला पाहिजे याबाबत सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी सुसज्ज ग्रंथालया सह अभ्यासिका निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यापुढे कालठण नं. १ हे आपले गाव पोलीस अधिकाऱ्यांचे गाव ही आपल्या गावाची
ओळख निर्माण झाली पाहिजे
ऍड. पाडुळे यांचा पोलीस उप निरीक्षक म्हणून आज सत्कार झाला यानंतर त्यांचा पोलीस अधिक्षक म्हणून सत्कार करण्याची मला भविष्यात संधी मिळावी ही इच्छा सिने अभिनेता भिमसेन चव्हाण यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भगवानबापू कोळेकर, प्रा.सतिश शिंदे सर , सुप्रसिद्ध निवेदक राजाभाऊ जगताप – पाटील, योगगुरू व पत्रकार काकासाहेब मांढरे, इ. मनोगत व्यक्त केले. तर चेअरमन किसनराव जावळे, पीडीसीसी बँकेचे शाखाधिकारी बापूसाहेब जगताप साहेब यांचे सह गावातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड. गोविंद पाडुळे मित्र परिवार यांचे वतीने विशेष प्रयत्न केले.