स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३ / २ / २०२३

पडस्थळ ता . इंदापूर जि.पुणे या ग्रामरपचयात हद्दीतील अवैध धंदे बंद करून गावाला शांततेच्या मार्गाने पुढे नेण्याचा पडस्थळ ग्रामपंचायतने घेतला निर्णय नूतन लोकनियुक्त सरपंच सौ.वैशालीताई पांडुरंग मारकड यांचे अध्यक्षतेखाली २६ जानेवारी २०२३ रोजी ग्राम सभा पार पडली झालेल्या च्या ग्रामपंचायत ग्रामसभेत मांडला यास उपसरपंच विद्याताई बोंगाणे यांनी अनुमोदन दिले या ग्रामसभेस सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थीत होते या निर्णयाचे गावातील शेकडो महिलांनी या निर्णयांचे स्वागत केले,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड यांनी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब यांना भेटून या मंजूर केलेल्या ठरावाची प्रत यांचेकडे इंदापूर पोलिस स्टेशन येथे जाऊन दिली व पडस्थळ गाव दारू मुक्त करण्याचि विनंती केली.यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी संचालक बळीकाका बोंगाणे माजी सरपंच सुभाष बोंगणे,अरुण झिटे ,गणेश गवाने विजय नगरे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
