स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . ४ / १ / २०२५ ) :
*इंदापूर* (दि.३) :- शिक्षण आणि साक्षरता क्षेत्रात महिलांच्या उन्नतीसाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची क्रांतिकारी मशाल ज्यांच्याकडे होती, ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती भिमाई आश्रमशाळेत (दि.३) शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने
संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात सावित्रीबाईंच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भिमाई आश्रमशाळेच्या सहशिक्षिका मनिषा जगताप-मखरे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार,तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व इंदापूरचे माजी नगराध्यक्ष, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी इंदापूर येथील भैरवनाथ प्रतिष्ठानकडून सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त माळी महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विकास शिंदे यांच्यासह युवराज शिंदे, सौरभ शिंदे, रामभाऊ शिंदे, नागेश शिंदे, तुकाराम शिंदे,सोमनाथ रासकर, निवृत्ती शिंदे, अक्षय शिंदे यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फळं व बिस्किटांचे वाटप केले.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे,सचिव ॲड. समीर मखरे,मुख्याध्यापक साहेबराव पवार,प्राचार्या अनिता साळवे तसेच विद्यार्थी, अधीक्षक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी सावित्रीच्या लेकींनी भाषणांतून सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
