स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . २० /१२/२०२४ ) :
विधान सभेची निवडणुक नुकतीच पार पडली यामध्ये इंदापूर विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार मा . नामदार दत्तात्रय मामा भरणे हे तिसऱ्यांदा विजयी झाले होऊन त्यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदी नुकतीच निवड होऊन कॅबीनेट मत्रीपदाची शपथ ग्रहण केली झाल्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या सर्व घटक पक्ष पक्षांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर नागरिक सत्कार रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता इंदापूर येथील श्री वाघ पॅलेस येथे आयोजित केला आहे तरी सर्व नामदार दत्तात्रय मामा प्रेमी सर्व नारगरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री . हनुमंत कोकाटे व इंदापूर शहर अध्यक्ष श्री . बाळासाहेब ढवळे पाटील यांनी केले आहे.