स्टार केबी न्यूज
संपादक -काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . ८ / १२ / २०२४ ) :
इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे सिने अभिनेते संकर्षण कराडे यच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदापूर शहर व परिसरात सामाजिक व शैक्षणिक कामात शहा कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. इंदापूर शहरात व परिसरात भरतशेठ शहा व शहा कुटुंब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विजेता महिलांना आकर्षक भेटवस्तू व पारितोषिके देण्यात येणार आहेत.होम मिनिस्टर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच

ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स, पुणे. यांच्या मान्यतेने व पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने मा. श्री. भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 2024 इंदापूर श्री 9 डिसेंबर 2024 रोजी सायं. 6 वा. इंदापूर श्री विजेत्यास रु.15000/- रोख व चषक
70 किलो वजनीगट खालील विजेत्यास 7000/- रोख व चषक बेस्ट पोजर 3000/- रोख व चषक मोस्ट इम्प्रुव्ह विजेत्यास 3000/- रोख व चषक देण्यात येणार आहे. तरी आयोजक मा. श्री. भरतभाऊ शहा मित्र परिवार संपर्क: 96656 86873, 77095 00707 91302 00300,99706 13333 यावर संपर्क साधावा.

वजन गट- 55, 60, 65, 70, 75, 80 व 80 किलो वरील खुला गट प्रत्येक गटातील १ ते ५ विजयी स्पर्धकांना अनुक्रमे रुपये 5000/-, 4000/-, 3000/-, 2000/-, 1000/- रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

स्पर्धक वजन तपासणी सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 दु. 3 ते 5 पर्यंत होईल या कार्यक्रमाचे स्थळ :- शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर, जि. पुणे हे आसून जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे आसे आवाहन आयोजक मा. श्री. भरतभाऊ शहा मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

सदर होमनिस्टर खेळपैठणीचा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे व शरसौष्ठव स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .