स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २४ / १ / २०२३ ) : श्रीनाथ सेवा संस्था व क्रिएटिव्ह अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा क्रिएटिव्ह अकॅडमी मध्ये घेण्यात आली. सदर स्पर्धा परीक्षेत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धा परीक्षेत लहान गट इयत्ता चौथी व मोठा गट इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर परीक्षेसाठी श्रीनाथ सेवा संस्था यांनी प्रथम पारितोषिकासाठी दोन हजार रुपये रोख,मेडल व प्रमाणपत्र द्वितीय नंबर साठी एक हजार पाचशे रुपये रोख , मेडल व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये रोख मेडल व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपये रोख असे बक्षीस ठेवण्यात आले होते. सदर स्पर्धा परीक्षेत इयत्ता चौथी मधून १)काव्या वैभव भोंग प्रथम क्रमांक. सारंग रेवननाथ देव द्वितीय क्रमांक तर ३) यश गणेश गव्हाणे याचा तृतीय क्रमांक इयत्ता पाचवी प्रथमेश शामसुंदर माने प्रथम क्रमांक श्रेयश माणिक चव्हाण द्वितीय क्रमांक रुद्र अमोल पाटील तृतीय क्रमांक
संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बोंगाणे सर यांच्या वतीने बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला .बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कृष्णा ताटे

सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर पत्रकार काकासाहेब मांढरे चांचेहस्ते प्रमाणपत्र मेडल श्रीफल गुलाब पुष्प देऊन सत्कार यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश जाधव सर,समाधान भोंग सर, अतुल साळुंखेसर , वैभव हेगडे सर, पवार सर ,घोळवे सर, काळे सर यांनी सहकार्य केले तसेच नरूटे यांनी सूत्रसंचालन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शेटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ बोंगाणे सर यांनी केले
यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते .

.