स्टार केबी न्यूज
संपादक काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २१ / १ / २० २३) :

नुकतेच पुणे जिल्हाअंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून इंदापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी दिलीप पवार यांची नियुक्ती झाली आहे. तर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून पोलीस खात्यात नावलौकिक आहेत.दिलीप पवार हे यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे कार्यरत होते.

सन २०२२ मध्ये भारत सरकारकडून उत्कृष्ट तपासी अधिकाऱ्यांकरीता दिले जाणारे “केंद्रीय गृहमंत्री पदक” पो निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाले आहे. लोणावळ्यात सर्वश्रुत असलेल्या डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात तपासी कामी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

अतिशय गंभीर गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट रित्या करणाऱ्या तपाशी अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. असे अधिकारी इंदापूरला मिळाल्याने नक्कीच इंदापूर पोलीस स्टेशनला नावलौकिक प्राप्त होणार आहे.

या अगोदर पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी इंदापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात उत्तम रित्या काम करून पोलीस स्टेशनला नावलौकिक प्राप्त करून दिले आहे.