स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि १६ / २ / २०२४ ) :
आज सकल मराठा समाजच्या वतीने इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दि . २६ रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या अवाहाना नुसार मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे व त्यांच्या सया सोयऱ्यां ना देखील मिळावे याकरीता राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या प्रमाण जमला होता यावेळी राज्य सरकारने तो अध्यादेश काढला होता तो अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांच्या कडे सुपुर्त करण्यात आला होता व आंदोलन स्थगीत करण्यात आले होते राज्य सरकारने २७जानेवारी रोजी काढलेला अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण चालू केले आहे या उपोषणादरम्यान होणारे विशेष अधिवेशन २० फेब्रुवारी रोजी होत असून या अधिवेशनात अध्यादेशाच्या बाजूने लोकप्रतिनिधीने मतदान करावे या मागणीसाठी सकल मराठा समाज इंदापूर तालुका लोकप्रतिनिधी म्हणून माननीय आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी दि १७ फेबुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्यानुसार उदया सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते अंथरूण पांघरून घेऊन भाकरी बांधुन आमदार भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन करणार आहेत .
*
