स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १ / २ / २० २४ ) :

विद्या प्रतिष्ठान संचलित विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे सिविल इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी कड देशमुख बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीमार्फत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली व विद्यार्थी निवड प्रक्रिया राबवण्यात आली.
याप्रसंगी मिलिंद कड-देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सिव्हिल इंजिनिअरिंग मधील असणाऱ्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले सिव्हिल इंजिनिअरिंग हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी नॉलेजबेस शिक्षण व प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये औद्योगीकरणामुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात अनेक बदल घडून येणार आहेत व त्याचा फायदा आगामी काळात सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे असे मत त्यांनी मांडले.
कंपनीकडून मिलिंद कड देशमुख, शेखर शिंदे व भावेश लवार्डे यांनी मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये
सत्यजित गमे, सागर देवकर, प्रताप सुर्वे व प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजय देशपांडे, सिविल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मयूर सुपेकर, प्रा. मुजम्मिल शेख, प्रा. महेश कुलकर्णी व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा योगेश जाधव उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की मिलिंद कड देशमुख हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आज यशस्वी उद्योजक आहेत व ते आज विद्यार्थी निवड करण्यासाठीआलेले आहेत याचा विशेष आनंद महाविद्यालयातील सर्वांनाच झालेला आहे.
येणाऱ्या पुढील स्पर्धात्मक काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणावरती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती महाविद्यालय भर देणार आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.योगेश जाधव यांनी सांगितले की या निवड प्रक्रियेसाठी परिसरातील विविध महाविद्यालयांमधील मिळून एकूण ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आगामी काळात विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर मधील विद्यार्थ्यांसाठी तसेच परिसरातील सर्वच ऑटोमोबाईल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन, व मेकॅनिकल या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भातील सर्वोत्कृष्ट संधी देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील राहील. सिविल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मयूर सुपेकर यांनी याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे व विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.