स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . २१ / १ / २०२४ ) :
इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी अनेक संस्था काढून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.या संस्थामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता निर्माण झाली.तालुक्याचे अर्थकारण या संस्थावर अवलंबून आहे.मात्र काही विरोधक जाणून बुजून या संस्था बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहेत.त्यांनी हे तात्काळ थांबवावे अन्यथा, सर्व सामान्य जनता, शेतकरी व कर्मचारी त्यांना धडा शिकवेल असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये निरा-भिमा व कर्मयोगी कारखान्याच्या शेतकऱ्यांची बिले व कामगारांच्या पगारी वेळेवरती दिल्या जात नाहीत असा बिनबुडाचा आरोप केला आहे. मात्र,माझे विरोधकांना आव्हान आहे की त्यांनी कामगारांना व शेतकऱ्यांना अगोदर विचारावे की तुमची बिले व कामगारांच्या पगारी वेळेवर होतात की नाहीत याची शहानिशा करावी.
ज्या कोणाला याची पूर्ण माहिती हवी आहे त्यांनी कारखान्यावरती वेळ काढून यावे त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीला पुराव्यानिशी संपूर्ण माहिती देऊ.मात्र विरोधकांनी एक संस्था काढलेली नाही . परंतु, ज्यांनी संस्था काढल्या त्या संस्थेला बदनाम करण्याचे काम करू नये. मोकळ्यात बडबड करण्यापेक्षा संस्थेवर या तुम्हाला पूर्ण माहिती देऊ तरीही संस्थेची बदनामी करत असाल तर सर्वसामान्य जनता तुम्हाला योग्य जागा दाखवून देईल असे राजवर्धन पाटील म्हणाले.
खोटे आरोप करणारे लोक किती विद्वान आहेत हे तालुक्यासह सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या बुडाखालचा अंधार झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्यावर बेछूट आरोप करू नयेत. कारण, स्वर्गीय शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांची आम्हाला शिकवण आहे म्हणून आम्ही शांत आहोत. अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा निर्वाणीचा इशारा राजवर्धन पाटील यांनी दिला आहे.
