इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे चौकातील घुमट तोडण्यास परवानगी कोणी दिली ?- तुषार खराडे – वीरश्री मालोजीराजे चौक घुमटवरील हातोड्याची घटना निषेधार्ह इंदापूर : प्रतिनिधी दि.19/1/24 इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे चौक घुमट वरती चालविलेला हातोडा अतिशय दुर्दैवी असून, घुमट तोडण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. जर मालोजीराजे चौकातील घुमट तोडायचे होते तर विद्यमान लोकप्रतिनिधीनी घुमट उभारण्याचा देखावा कशासाठी केला ? मालोजीराजे चौकातील घुमट तोडण्यास परवानगी कोणाची? असा सवाल इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी उपस्थित केला आहे. वीरश्री मालोजीराजे यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूरनगरीत, मालोजीराजांचे घुमट तोडण्याची अतिशय धक्कादायक व निंदनीय घटना घडली असून त्यामुळे जनतेच्या श्रद्धास्थानावर घाला घालण्यात आला आहे. परिणामी जनतेमध्ये चीड निर्माण झाली असून, मालोजीराजेंचे महामार्गावरील चौकातील घुमट जाणून-बुजून तोडण्यात आले आहे अशी इंदापूरकरांची भावना आहे. वीरश्री मालोजीराजेंचे घुमट तोडण्यास परवानगी कॊणी दिली हे जनतेला समजले पाहिजे. मालोजीराजांचे घुमट तोडण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी केली आहे.

इंदापूर : प्रतिनिधी दि.19/1/24

इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे चौक घुमट वरती चालविलेला हातोडा अतिशय दुर्दैवी असून, घुमट तोडण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. जर मालोजीराजे चौकातील घुमट तोडायचे होते तर विद्यमान लोकप्रतिनिधीनी घुमट उभारण्याचा देखावा कशासाठी केला ? मालोजीराजे चौकातील घुमट तोडण्यास परवानगी कोणाची? असा सवाल इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी उपस्थित केला आहे.
वीरश्री मालोजीराजे यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूरनगरीत, मालोजीराजांचे घुमट तोडण्याची अतिशय धक्कादायक व निंदनीय घटना घडली असून त्यामुळे जनतेच्या श्रद्धास्थानावर घाला घालण्यात आला आहे. परिणामी जनतेमध्ये चीड निर्माण झाली असून, मालोजीराजेंचे महामार्गावरील चौकातील घुमट जाणून-बुजून तोडण्यात आले आहे अशी इंदापूरकरांची भावना आहे. वीरश्री मालोजीराजेंचे घुमट तोडण्यास परवानगी कॊणी दिली हे जनतेला समजले पाहिजे. मालोजीराजांचे घुमट तोडण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी केली आहे.
__________________________