स्टार केबीन्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. २६ / १२ / २० २३)
:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून बारामती लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा ध्यास घेण्यात आला आहे. यासाठी व्यूहरचना आखण्यास भाजपने सुरूवात केली असून याचाच एक भाग म्हणून बारामती लोकसभेसाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक पुढील काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेत आतापासूनच पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स, बँनर्स लावले जात आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांचे इंदापूर तालुक्यामध्ये भावी खासदार चे फ्लेक्स झळकले आहेत. हे फ्लेक्स सोशल मीडियावर देखील चांगलेच व्हायरल होत असल्याने अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा आता सुरु झाली आहे.