उरुसानिमीत्त भरत शहा यांच्या हस्ते झाले प्रसादाचे वाटप..
स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २४ / १२ / २० २३):
हिंदू – मुस्लिम ऐ
क्याचे प्रतिक असणारे इंदापुर शहरातील चाँदशहावली बाबांचा उरुस (दि. २०) डिसेंबर रोजी पासून सुरु झाला आहे. त्या निमित्ताने माजी नगरसेवक भरत शहा यांनी चाँदशहावली दर्गाह येथे उपस्थित राहून चाँदशहावली बाबांना चादर अर्पण केली. कमिटीच्या वतीने उपस्थितांना भरत शहा यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले.

चाँदशहावली बाबांचा दर्गाह हे समस्त इंदापूरकर वासीयांचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी चाँदशहावली बाबांच्या उरुसानिमीत्त हिंदू मुस्लिम एकत्र येऊन चाँदशहावली बाबांना चादर अर्पण करून अभिवादन करतात. हिंदू – मुस्लिम समुदायातील सामाजिक सलोखा या निमित्ताने दिसून येतो.
उरुस कमिटीचे वतीने भरत शहा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य विश्वस्त जाफर मुजावर, महमूद मुजावर, उरुस कमीटीचे अध्यक्ष आझादभाई पठाण, महादेव चव्हाण सर, हमीद आतार, आझमभाई पठाण, आर्षद सय्यद, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
