स्टार केबी न्यूज

इंदापूर (दि.22/12/23 ) :
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थी सहल अपघातात मृत्यूमुखी पडलेले शिक्षक बाळकृष्ण हरिभाऊ काळे यांच्या रेडणी येथे जाऊन काळे कुटुंबियांचे शुक्रवारी (दि.22) सांत्वन केले.
मयत शिक्षक बाळकृष्ण काळे हे बावडा येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. या शिक्षण संस्थेचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे अध्यक्ष आहेत. या विद्यालयाची कोकण परिसराची शैक्षणिक सहल पूर्ण करून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एस.टी.ला गुरुवारी झालेल्या अपघातामध्ये बाळकृष्ण काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बाळकृष्ण काळे हे आदर्श शिक्षक होते, त्यांच्या जाण्याने विद्यालयाने गुणवंत शिक्षक गमावला आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण काळे कुटुंबीयांसोबत आंम्ही सर्वजण आहोत, असे सांत्वन भेटी प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या सांत्वन भेटी प्रसंगी विलासराव वाघमोडे, भीमराव काळे, अमरदीप काळकुटे, प्रकाश शेडगे आदीसह काळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
__________________________