स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १८ / १२ / २०२३ j:

इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील युवा उद्योजक, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष ज्यांच्याकडे कुठलंचे राजकीय ,सामाजिक पद नसताना इंदापूर तालुक्यातील वडापुरी- काटी जिल्हा परिषद, पंचायत समिती गटातील सर्वसामान्य नागरिकांनी ज्यांना भावी जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून पदवी दिली असे अमोलराजे इंगळे यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी बुधवारी (दि.१३) जाहीर केली.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी अमोलराजे इंगळे यांची निवड झाल्यानंतर इंदापूर तालुक्यासह माढा, बारामती, करमाळा, माळशिरस, फलटण अशा इंदापूरच्या चारी बाजूच्या तालुक्यातील आणि अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी शुभेच्छा वर्षाव केला आहे.तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडचणीला, समस्याला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते .कुठलंचे सामाजिक, राजकीय पद नसताना पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांनी जी कामे करायची असतात ते सदस्य किंवा पदाधिकारी आपल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या मागेपुढे करण्यात दंग आहेत.

कुठलंही पद्धत नसताना ,सर्वसामाच्या प्रत्येक अडचणीला, सुखदुःखाला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून अमोलराजे इंगळे यांची ओळख आहे.थेट जनतेशीं नाळ जोडलेला आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारा कार्यकर्ता म्हणून अमोलराजे इंगळे यांच्याकडे पाहिले जाते . काटी गावा मधून आण्णासाहेब सोलंकर, सचिन आरडे,सचिन परांडे, सुनिल लवटे,सागर वाघमोडे, अतुल वाघमोडे, दिपक गुळवे, रेडा गावामधून नानासाहेब देवकर, हनुमंत देवकर, चंद्रशेखर देवकर, धनंजय गायकवाड, दादासाहेब सोनटक्के, प्रसाद देवकर, सुनिल मोहिते, रेडणी गावातील महर्षी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमरदीप काळकुटे, प्रफुल चव्हाण, डॉ. सुरेश खाडे, निरवांगी ,मानेवस्ती शंकर शेंडे, सराफवाडी मधून निरा भिमा सहकारी साखर कारखाने संचालक राजकुमार जाधव ,

निमगाव केतकी मधून मार्केट कमिटीचे संचालक तुषारशेठ जाधव, शेटफळ हवेली संजय शिंदे,वडापुरी गावातून हरिभाऊ जाधव, बाभुळगाव ,हिंगणगाव, तरटगाव, भांडगाव, भाटनिमगाव ,काटी, वडापुरी,वरकुटे , लाखेवाडी,रेडा ,रेडणी ,जाधववाडी,पिटकेश्वर , कांदलगाव,शहा या गावातून अक्षरशः अमोलराजे इंगळे यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे. योग्य व्यक्तीची निवड झाल्याने तालुक्यातून आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय कार्यमंत्री व पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्षा अंकिताताई पाटील-ठाकरे यांच्या उपस्थित अमोलराजे इंगळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अंकिताताई पाटील-ठाकरे,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून अमोलराजे इंगळे यांची ओळख असून इंदापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. निवडी नंतर बोलताना अमोलराजे इंगळे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने दिलेले आशीर्वाद आणि त्यांची सेवा करण्याची असलेली निस्वार्थी भावना व इंदापूर तालुक्यातील तमाम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल तसेच न्यूज पोर्टल असेल ,ज्येष्ठ पत्रकार, युवक मित्रांनी वेळोवेळी सहकार्य केले व सर्वांच्या सहकार्याने काम करण्याची उमेद मिळते अशी भावना व्यक्त केली.
शेअर करा

असण्याची दबक्या आवाजात कुजबुज आहे. युवा किंवा जेष्ठ खासदारांच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता असून पवार घराण्यातीलच एकांदा खासदार चेहरा बदलून होण्याची शक्यता आहे? त्यामुळे खासदारकीचा चेहरा व पक्ष ही बदलण्याची चिन्ह दिसून येत असल्याची बोलले जात आहे. इंदापूरला निवडून गेल्यानंतर पाच वर्षातून एकदा मत मागायला येणाऱ्या ख