धक्कादायक : इंदापूर तालुक्यातील बिजवडीत आढळले नवजात महिला जातीचे अर्भक…
December 17, 2023

:

इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे अज्ञात दोन तासाचे जन्मलेले नवजात महिला जातीचे अर्भक आढळल्याने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 16 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील ससाने यांच्या घराच्या पाठीमागील वन विभागाच्या क्षेत्रा मधील कच्या रोडच्या बाजूला असलेल्या चारीमध्ये एक महिला जातीचे नवजात जिवंत बालक अर्भक वय अंदाजे दोन तास कोणीतरी अज्ञात स्त्रीने पूर्णता परित्याग करण्याच्या उद्देशाने उघड्यावर टाकून दिले असल्याची फिर्याद बापू नामदेव पालवे (वय 25 वर्ष रा. बिजवडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसात दिली आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदापूर पोलिसात एका अज्ञात स्त्रीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडूळे करीत आहेत.

त्या महिला नवजात अर्भकास पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.