स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे ( दि. १३ / १२ / २०२३ ) :

इंदापूर शहरातील सर्व व्यापार्‍यांनी इंदापूरातील सिद्धेश्वर मंदिरात एकत्र येत शहराच्या मुख्य बाजार पेठेतून मंगळवार(दि. १२) सकाळी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यापर्यंत चालत जावून एल्गार केला. यामध्ये इंदापूर व्यापारी संघटनेचे
अध्यक्ष भरत शहा, सचिव मेघःश्याम पाटील, उपाध्यक्ष संदीप वाशिंबेकर, सहसचिव दिलीप कासार, संजय दोशी, नरेंद्र गांधी, संजय बानकर, विकास किरकत व शहरातील शेकडो छोटे-मोठे व्यवसायिक, व्यापारी, दुकानदार मोर्चात सहभागी झाले होते.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की, वारंवार विविध संघटना, पक्षयांच्याकडून काही घटना घडल्यास त्याचा निषेध म्हणून इंदापूर शहर
बंदचे आवाहन करण्यात येते.
त्यामुळे शहरातील सर्व छोटेमोठे व्यापारी, व्यावसायिक यांना
बंदमध्ये सहभागी व्हावे लागते;परंतु असे बंद वारंवार झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगार, मोलमजुरी करणाऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. असे असताना मागील काही वर्षामध्ये कोरोना काळ व मागील दसरा, दिवाळी सणावारांच्या दिवशी ही अशाप्रकारचे बंद ठेवण्यात आले. ही बाब प्रशासनासआम्ही वेळोवेळी निदर्शनास आणूनदिलेली आहे. इंदापूर शहर व्यापारीसंघाच्या वतीने निवेदने दिलेलीआहेत; परंतु या विषयी प्रशासनआणि सामाजिक संघटना, सर्वचपक्ष यांनी दखल घेतलेली नाही,
म्हणून याद्वारे आपणास नम्र विनंती करणेत येते की इथुन पुढे इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने व्यवसाय, उद्योगांना मारक ठरणाऱ्या अशा बंदला दुकाने, व्यवसाय बंद ठेवणार नाही असा सर्वानुमते संघाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.

तरी आपणास निवेदनाद्वारे पुनछ विनंती करण्यात येते की, या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून दुकानदार व्यवसायीक यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी व निर्भयपणाने आमचे व्यापारउदीम चालू रहाणेस सहकार्य करावे ही विनंती.

असे निवेदनात नमूद केले आहे.