स्टार के बी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर
:
पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समिती च्या योग प्राणायाम स्थायी केंद्राच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने
शहा ब्रदर्स अँड कंपनी यांच्या सौजन्याने, ज्येष्ठ योग मार्गदर्शक श्री दत्तात्रय अनपट व मदन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, पतंजली योग परिवाराचे सचिव सुधीर मखरे यांनी दिली.

इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे, सोमवार दि. ४ डिसेंबर ते ग बुधवार दि. ६ डिसेंबर पर्यंत, दररोज पहाटे ५ ते सकाळी ७.१५ वाजेपर्यंत मोफत योग प्राणायाम शिबिर घेतले जाणार आहे. इंदापूरच्या योगशिक्षक व योग साधकांनी मागील एकोणीस

इंदापूर शहरात अखंडपणे योग प्राणायम स्थायी केंद्र मोफत सुरू ठेवले आहे.

या केंद्रामध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. मधुमेह, रक्तदाब, दमा, स्थुलपणा, त्वचाविकार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, मनक्याचे आजार, अर्धांगवायु, मुळव्याध, वंध्यत्वविकार कर्करोग, मानसिक ताण तणाव अशा अनेक शाररीक व मानसिक विकारांपासून अनेकांना मुक्ती मिळालेली आहे. तसेच पतंजली योग परिवार व संजीवन योग सेवा संस्थेमार्फत अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवले जातात. गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलांच्या योगासन, सुर्यनस्कार स्पर्धा घेणे लहान मुले व युवक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार होऊन त्यांच्यामध्ये व्यायामाची योग प्राणायामाची आवड निर्माण व्हावी. शारिरीक, मानसिक व बौध्दीक दृष्ट्या सुदृढ होऊन ते देशाचे सुजान व बलशाली नागरीक व्हावेत, यासाठी बाल योग संस्कार केंद्र सुरू ठेवले आहे.

या तीन दिवशीय मोफत योग प्राणायम शिबिरामध्ये सोमवार ४ डिसेबर २० २३ रोजी पुणे येथील जेष्ठ योग मार्गदर्शक श्री .अनंत झांबरे, योगप्राणायाम व आयुर्वेद यावर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच मंगळवार दि . ५ डिसेबर रोजी बीड येथील जेष्ठ योगशिक्षक अँड. श्रीराम लाखे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
त्याचप्रमाणे बुधवार दि .६ डिसेबर रोजी नॅचरोपॅथी व योग सायन्स व महाराष्ट्र राज्य महिला पतंजली वरिष्ठ राज्य प्रभारी सौ. सुधाताई अळ्ळीमीरे यांचे आरोग्य आणि उपचार यावर मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर पतंजली योग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.