राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका सध्या सुरू असून
आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटदेखील अॅक्शन मोडवर आला असून, पक्षातील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा तसेच नविन पदाधिका त्यांच्या नेमणुकीचा धडाका शरद पवारांनी लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) इंदापूर तालुकाध्यक्षपदी अॅड. तेजसिंह पाटील व कार्याध्यक्षपदी इंदापूरचे महारुद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अँड. तेजसिह पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते असून शरद पवारांचे अतिशय निष्ठावान समजले जातात तसेच महारुद्र पाटील देखील शरद पवार यांच्या जवळ चे समजले जातात त्यांनी पूर्वी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदावर चांगले काम केले परंतु राष्ट्रवादीत पवार निष्ठावंतावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रवादी सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेना अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून शरदपवार गट व अजित पवार गट असे दोन गट पडले शरद पवार गटाने पूर्वीच्या पदाधिकार्यांना पदावरून बरखास्त केले त्यानंतर अजित दादा गटाने त्यांच्या गराकरीता त्यांची पुन्हा नियुक्त केले .
महारुद्र पाटील यांनी नुकतीच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आणि त्यांची तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झाली . दोन्ही नेत्यांचा तालुक्यात चांगला संपर्क असून .
आदरणीय शरद पवार साहेब खासदार सुप्रीया सुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखविलेला विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन पक्ष बळकट करणार असल्याचे त्यांनी निवडी नंतर बोलताना म्हटले .