स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १७ / १० / २० २३) :

इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने इंदापुरात शनिवार दि . २१ आक्टोंबर रोजी मनोज जरंगे पाटीलांच्या  जाहिर सभेचे आयोजन . .

आज मंगळवार दि . १७ / १० / २०२३ रोजी सकाळी ११ वाजता इंदापूर येथील शासकीय विश्राम गृह या ठिकाणी इंदापूर तालुका सकल मराठा समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली होती .

शनिवार दि . २१ / १० / २० २३) रोजी इंदापूर येथील नविन नगरपालिकेच्या इमारती शेजारील भव्य मैदानावरती दुपारी २ वाजता मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा होणार असल्याचे इंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रवीण पवार व पवनराजे घोगरे यांनी माहिती दिली .

यावेळी या सभे करीता होणारा खर्च इंदापूर सकल मराठा समाज स्व इच्छेने देणगी देऊन करणार आहेत ज्यांना देणगी द्यावयाची आहे त्यांनी  094224 92455 या फोन नं.१ वरती पाठवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले त्याच प्रमाणे अनेक बांधवांनी ग्राऊंड तयार करण्याकरीता लागणारे ट्रॅक्टर जीसीपी स्वखर्चाने  मोफत देणार तसेच मंडप साऊंड स्टेज खर्च जरांगे पाटील यांच्या वर फुले उधळण्या करीता जेसीपी व फुले मोफत देणार तसेच सभेसाठी येणार्‍या कार्यकत्यांना लागणारे बिसलरी  पाणी मोफत देणार असल्याचे मराठा बांधवांनी स्विकारली आहे .

सभेसाठी येणार्‍या . बांधवांना इंदापूरचे डॉक्टर  मेडीकल असोशियन तसेच अँब्युलंन्स सेवा देणार आहेत . या सभे करीता येणार्‍या वाहनांकरीता ४ ठिकाणी पार्कीग व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच सभेचे व्यवस्थापण व नियोजन व्यवस्थीत पणे व्हावे या करीता २०० स्वयंसेवक सेवा करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली तरी .

या सभेस माहिला व पुरुष बांधकांनी सभेकरिता मोठ्या संख्येने यावे असे आवाहन इंदापूर तालुका सकल मराठा संघाच्या वतीने करण्यात आले आहे .

 आरक्षण आंदोलन आणि त्यावरुन सरकारची झालेली कोंडी, तसेच जरांगे पाटील यांनी नुकतीच घेतलेली विराट मराठा सभा यामुळे इंदापूर  तालुक्यात होणाऱ्या या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील भेट देऊन येथे आयोजित सभेला संबोधीत करणार आहेत. सभेसाठी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  यांनी केले आहे .