स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १ ३ / १० / २० २३): 1

समाजात पुरुषांबरोबर स्त्रीया देखील प्रत्येक  ठिकाणी अग्रेसर राहिल्या आहेत, आपली घरातील जबाबदारी पूर्ण पाडून चूल आणि मूल यापेक्षाही केल्यानंतर खूप काही करता येते हे स्त्रियांनी आपल्या कामाच्या स्वरूपातून नेहमीच दाखवून दिले आहे. नेहमी शांत संयमी वाटणारी भगिनी जेव्हा आपल्या कुटुंबावर आपल्या समाजावर वेळ येते तेव्हा ती दुर्गेची भूमिका साकारून आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभि असते अशाच प्रकारे सर्व गोष्टींचा विचार करून समाजात प्रशासकीय राजकीय सामाजिक शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अशा स्त्रियांचा सन्मान करणे आद्य कर्तव्य म्हणून इंदापूर तालुका तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती आरजी साबळे यांनी दिली, हा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत इंदापूर पंचायत समिती हॉल येथे १७ ऑक्टोंबर २० २३ रोजी  सायंकाळी पाच वाजता होणार आहे.यावेळी गणेश भाऊ शिंगाडे, सद्दाम भाई बागवान, विजय पवार हे व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.