काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १३ / १० / २० २ ३ ) : ‘
इंदापूर येथे पतंजली योग परिवार इंदापूर व शहा चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या नवरात्र उत्सवाचे औपित्य साधत कामधेनु सेवा परिवाराचे संस्थापक समाज भूषण डॉ लक्ष्मणराव आसबे यांचे *ध्यान व कुंडलिनी शक्ती जागरण* याबाबत व्याख्यान आज शुक्रवार दि १३ / १० / २०२३ ) शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे स्थायी योग वर्गामध्ये पहाटे ५ १५ ते सकाळी ७ वाजे पर्यंत या कालावधीत आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानास मोठ्या संख्येने पुरुष व महिला साधक उपस्थित होते त्याच प्रमाणेइंदापूर पतंजली योग समीतीच्या मार्ग दर्शना खाली कालठण नं. १ सारख्या ग्रामीण भागात गेली १ वर्षा पासून अखंड पहाटे ५ ते सकाळी ६ ३० वाजेपर्यंत दररोज शेकडो साधक साधिका योगा करत असतात आज देखील त्यांनी डॉ. आसबे यांचे योगा विषयीचे संपुर्ण पणे ऑनलाईन लाईव्ह व्याख्यान ऐकविण्यात आले तसेच पुणे , सोलापूर ,सांगली , कोल्हापूर , सोलापूर , अकलूज , बारामती , पंढरपूर , सांगोला, अहमदनगर येथील ऑन लाईन जोडलेल्या शेकडो साधकांनी या व्याख्याना चा लाभ घेतला व प्रतिक्रिया देखील ऑनलाईनच दिल्या .
यावेळी मार्ग दर्शन करताना डॉ. आसबे यांनी आध्यात्मिक उत्थान तसेच संपूर्ण रोग मुक्तीसाठी. जीवनात उत्साह, समाधान आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी साठी योग आणि ध्यान आवश्यक आहे. त्याचबरोबर आंतरिक शक्ती किती महत्वपूर्ण कामगिरी करते याबाबत प्रबोधन डॉ आसबे यांनी सर्वसाधकांपर्यंत अगदी सोप्या भाषेत समजावून दिले
नवरात्र उत्सवाच्या दरम्यान कुंडलिनी शक्ती जागरण होण्याचा सर्वोच्च काळ असतो योग प्राणायाम याचबरोबर ध्यानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व सर्वसाधकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या व्याख्यान आयोजित करण्या मागे उध्देश होता तो डॉ आसबे सरांच्या मार्ग दर्शनाने सफल झाला असे मत इंदापूर पतंजली योग परिवाराचे अध्यक्ष श्री दत्तात्रय अनपट यांनी म्हटले
आध्यात्मिक उत्थान तसेच संपूर्ण रोग मुक्तीसाठी. जीवनात उत्साह, समाधान आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी साठी योग आणि ध्यान आवश्यक आहे. त्याचबरोबर आंतरिक शक्ती किती महत्वपूर्ण कामगिरी करते याबाबत प्रबोधन डॉ आसबे यांनी सर्वसाधकांपर्यंत अगदी सोप्या भाषेत समजावून दिले
व्याख्यान झाल्यानंतर पतंजली योग परिवाराचे सदस्य श्री जितेंद्र माने देशमुख यांची दि एन्व्हायरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ आसबे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पुरुष व महिला साधकांनी संघटितपणे प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधीर मखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पतंजली योग परिवाराचे उपाध्यक्ष श्री मदन चव्हाण यांनी मानले