स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १० /१० / २० २३) :

इंदापूरच्या नायब तहसीलदार सौ. निर्मला मखरे यांचे इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतचे शिक्षण इंदापूर येथील मुलींची शाळा नं. १ याठिकाणी झाले त्यांनतर ५वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण हे श्री नारायण दास रामदास हायस्कुल येथे १९८० – ८१ साली झाले त्यानंतर १२ वी पर्यंत चे शिक्षण  कला आणि वाणिज्य महाविदयालय इंदापूर या ठिकाणी झाले सुरुवाती पासूनच त्यांना खेळाची आवड होती त्यांनी अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक बक्षीसे ही मिळवली त्या इंदापूर तहसील कार्यालयात १९८५ साली नोकरीस लागल्या .

त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदावर ३८ वर्षे व ७  महिने उत्कृष्ट पणे काम  केल्यानंतर त्या दिनांक ३०सप्टेंबर २०२३ रोजी  इंदापूर येथेच नायब तहसीलदार पदावरून निवृत्त होण्याचे भाग्य त्यांच्या नशीबी आले त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा इंदापूरकर नागरीकांच्या वतीने रविवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता .

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपजील्हा अधिकारी श्री . किशोर पवार साहेब हे होते तर अध्यक्षस्थानी इंदापूरचे तहसीलदार श्री . श्रीकांत पाटील साहेब हे होते .

 यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर आलेल्या प्रमुख मान्यवरांचा

सौ .निर्मला मखरे त्यांचे पति नंदकुमार शिंदे मुलगा स्नेहलकुमार शिंदे सुनबाई सौ . वैशाली शिंदे यांनी

 शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व सर्वांना धन्यवाद दिले .

 त्यानंतर सौ निर्मला मखरे व त्यांचे पति श्री .नंदकुमार शिंदे   यांचा फेटा बांधून हार शाल व सन्मानचिन्ह देऊन किशोर पवार व श्रीकांत पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला . त्यानंतर त्यांचा विविध संस्था संघटना यांच्या वतीने पुष्पगुच्छ फेटा हार श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला यामध्ये महसूल कर्मचारी संघटना सामाजिक संघटना विविध खात्याचे अधिकारी तलाठी संघटना त्याचप्रमाणे त्यांच्या शालेय जीवनातील  १० वी तील ४० वर्षा पूर्वीचे अनेक मित्र मैत्री इंदापूर तालुक्यातून तसेच पुणे सातारा , अहमदनगर , बारामती सोलापूर येथून आर्वजून उपस्थित राहिले होते त्यांच्या  वतीने सत्कार करण्यात आला .

 याप्रसंगी प्रा कृष्णा ताटे तसेच सेवा त्यांना त्यांच्या जीवनातील व सेवा कार्य काळातील अनेक आठवणी व प्रसंग सांगितले व त्यांना पुढील आयुष सुखकर जावो याकरीता शुभेच्छा दिल्या .

यावेळी बोलताना तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब म्हणाले की इथून पुढे मखरे मॅडम यांनी राहिलेले आयुष्यात कुटुंबाला वेळ द्यावा तसेच समाजाची सेवा करावी आनंदी जीवन जगावे नातेवाईकाकडे जावे पर्यटन करावे राहिलेल्या गोष्टी करून घ्याव्यात असा सल्ला दिला तसेच माजी उप जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी त्यांच्या प्रशासकीय काम करताना त्यांनी  अतिशय  आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम कसे करून घ्यायचे हे कसब त्यांच्या अंगी होते तसेच शिस्तबद्धपणा त्यांच्या अंगी होता असे त्यांनी सांगितले  त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या .यावेळी

सत्काराला उत्तर देताना सौ . मखरे मॅडम म्हणाल्या

मला नोकरीमुळे माझ्या कुटूंबाला  पुरेसा वेळ देता आला नाही तसेच कामे करीत असताना अनेक प्रसंगातून मार्ग कसा काढावयाचा ते  माझ्या वरीष्टां कडून शिकायला मिळाले त्यामुळे मला काम करताना कोणत्याच अडचणी आल्या नाहीत.

या कार्यक्रमास  पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बाबुराव पवार सेवानिवृत्त तहसीलदार भोईटे साहेब आर आर सोनटक्के साहेब पाचनकर साहेब तसेच नायब तहसीलदार अनिल ठोंबरे अजय पाटील गौरी तेलंग त्याचप्रमाणे सर्व सेवानिवृत्त मंडळ अधिकारी तलाठी कर्मचारी तहसील कर्मचारी तसेच नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री नरुटे यांनी केले