स्टार केबी न्यूज
संपादक : काकासाहेब मांढरे ( दि. ७ / ७ / २०२३ ) :
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सा मील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी प्रदीप गारटकर उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्र जाहीर करण्यात आले आहे.
पत्रात नमूद केले आहे की, राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना दि. २ जुलै, २०२३ पासून पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच सूचित करण्यात आले आहे की, यापुढे त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुचित केले आहे.
