स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २७ / ६ / २० २३) :

नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व तेजपृथ्वी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी गोरगरीब शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवणे तसेच गोरगरिबांना मदत करणे तसेच राष्ट्रीय संसद सरपंच संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नासाठी सतत झटत राहणे या वअशा अनेक प्रश्नावर नेहमी काम करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अनिताताई खरात आणि त्यांच्या वाढदिवशी वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांनी व युवा कार्यकर्त्यांनी अनिताताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यां कामाला साजेल असे सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरवले आहे गोरगरिब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून त्यांना शालेय साहित्य वाटप तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण वृद्धाचीं सेवा घडण्यासाठी वृद्ध माता पीतांना जेवणाचा कार्यक्रम असे सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत,मग त्यात खोरोची,रेडणी, हिंगणगाव, इंदापूर, टेंभुर्णी, वडापुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी व युवकांनी अनिताताईचयां वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, फळे वाटप, लहान मुलांना खाऊ वाटप ,वृद्ध मातापित्यांना जेवण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
