स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २० / ६ / २० २३) :
21 जु न जागतीक योगदिवसाच्या जनजागृतीसाठी योग प्रचार प्रसारासाठी पतंजलि योग समिती व युवा भारतच्या इंदापूरच्या वतीने रन फाॅर योगा आणि मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी शंभर मशाली घेऊन शहरातुन रॅली काढण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गोरख शिंदे, कृष्णा ताटे सर,जयंत नायकुडे ,रमेश शिंदे, गफूर सय्यद, भारत स्वाभिमानचे अध्यक्ष जयकुमार शिंदे बिभिषण खबाले मल्हारी घाडगे यांचे हस्ते ज्योत प्रज्वलीत करण्यात आली..
1 1
मंगळवारी सकाळी सहा वाजता इंदापूर शहरांमधील विविध प्रभागामधून रन फॉर योगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी 21 जून जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे विनंती करण्यात आली यावेळी करे योग रहे निरोग, भारत माता की जय, वंदे मातरम ,जय जवान जय किसान घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली प्रसंगी बहुसंख्येने योगशिक्षक,पुरुष योगसाधक व महिला योगसाधक उपस्थित होते . 21 जून च्या जागतिक योग दिनासाठी इंदापूर पतंजली योग समिती व युवा भारतच्या वतीने विविध ठिकाणी योगशिबीरामधुन योग दिनाची जनजागृती करण्यात आली
जयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत कार्यक्रमामध्ये रविंद्र परबत सचिन पवार शंकर काशीद शरद झोळ रामेश्वर साठे भालचंद्र भोसले किसन पवारआण्णासाहेब चोपडे हमीद आतार सुनिल कांबळे गोकुळ हराळे गणेश शिंदे समिधान भोरकडे जयश्री खबाले रेखा भंडारी यांचेसह बहुसंख्य योगसाधक उपस्थित होते..
