स्टार केबी न्यूज

इंदापूर: मधील मालोजीराजे गढीवरील ऐतिहासिक चिंचेचे झाड पाडल्याने वास्तव्यास असलेल्या शेकडो परदेशी चित्रबलाक पक्षी, पिल्ले यांचा तरफडून मृत्यू झाल्याचे चित्र .
इंदापूर येथील मालोजीराजे गढीवर शेकडो वर्षांपूर्वीचे अनेक चिंचेचे झाडे आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्या चिंचेच्या झाडावर परदेशी चित्रबलाक पक्षी जून महिन्यामध्ये वेणीच्या( प्रजनन) काळामध्ये ते त्या चिंचेच्या झाडावर आपली घरटे बांधून तिथे वास्तव्य करत असतात. तिथे ते अंडी घालून शेकडो पिल्लांना जन्म देतात आणि ते पक्षी प्रजनन काळ संपल्यानंतर ते निघून जात असतात असे असताना काही दिवसापासून मालोजीराजे गढीवरील चिंचेचे झाड हे मानवी किंवा नागरिकाच्या जीवाला धोकादायक ठरले असे काहीजण बोलत होते तर काहीजण चिडेचूप होते, काही जण बघ्याची भूमिका घेत होते अशी चर्चा आहे.
संबंधित झाड जर धोकादायक आहे तर ज्यावेळेस हे लक्षात आले असताना असे म्हणायला पाहिजे होते की, सदरचे चिंचेचे झाड मानवी, नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्या चिंचेचे झाडावरील चित्रबलाक पक्षी व त्याचे पिल्ले, अंडी यांच्या वास्तव्याला,जिवाला धोका निर्माण झाला आहे.संबंधित वन विभाग व प्रशासन अधिकाऱ्याने चित्रबलाक आणि त्याचे अंडी, पिल्लांचे पुनर्वसन करून त्या झाडाची तात्काळ विलेवाट लावावी असा पाठपुरावा करून मागणी करायला हवी होती.
असे असताना अखेर (दि.१६) जून २०२३ रोजी मालोजीराजे गढीवरील म्हणजे जुन्या तहसील कचेरीतील धोकादायक झालेल्या चिंचेच्या झाडाची खबरदारी न घेता इंदापूर नगरपालिकेच्या संबंधित विभागाने जेसीबीच्या साह्याने ऐतिहासिक चिंचेचे झाड पाडण्यात आले आणि शेकडो चित्रबलाक पक्षाची अंडी,पक्षी, पिल्लांचा तरफडून बळी गेला. त्यामध्ये वटवाघळांचाही समावेश होता. शेकडो चित्रबलाक पक्षी, पिल्ले व त्याच्या अंड्याचा बळी घेणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान संबंधित दौंड येथील रेस्क्यू टीम, इको दौंड ही पक्षी रेस्क्यू टीम उशिरा दाखल झाल्याची चर्चा होती.
मुक्या शेकडो चित्रबलाक पक्षाचा बळी घेणारे मुर्दाड प्रशासन इंदापूरातील अतिक्रम आणि इतर प्रश्नांवरती हत्यार चालवणार का ?
मुक्या शेकडो चित्रबलाक पक्षाचा बळी घेणारे मुर्दाड प्रशासन इंदापूरातील अतिक्रम आणि इतर प्रश्नांवरती हत्यार चालवणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.मालोजीराजे गढीवर असणाऱ्या ऐतिहासिक चिंचेचे झाड आणि त्यावर शेकडो परदेशी चित्रबलाक पक्षी वास्तव्य करत आहेत. इंदापूर मधील गिधाडवृत्तीच्यांने कुठलही खबरदारी न घेता चिंचेचे झाड जमीनदोस्त करून ऐतिहासिक चिंचेचे झाड आणि त्यावर वास्तव्य करत असलेले शेकडो चित्रबलाक पक्षी, पिल्ले, अंडी याचा नाहक बळी घेतला आहे.या सर्व घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, पक्षी प्रेमी प्राध्यापक कृष्णा ताटे, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण, गफूरभाई सय्यद व विविध सामाजिक संघटना यांनी केली आहे ते म्हणाले, तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सखेसोयरे असे असताना एक तर चिंचेच्या झाडाच्या खोड आणि मुळे अतिशय दणकट, मजबूत आणि खोलवर असतात. त्याच्या एक दोन मुळ्या ढिल्या झाल्या म्हणजे अक्क झाड नष्ट होत नाही. कुठलेही पूर्वकल्पना, पूर्व सूचना न देता झाड पाडून शेकडो चित्रबलाक पक्षी, पिल्ले, अंडी यांचा बळी गेला असून तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशी त्यांनी मागणी केली.
घाई घाईने शेकडो मेलेल्या व जखमी चित्रबलाक पक्षांना कचरा डेपोत विल्लेवाट लावण्याचे गोडबंगाल काय ?
मालोजीराजे गढीवरील पाडलेले चिंचेचे झाड आणि त्यावरील शेकडो चित्रबलाक पक्षाची अंडी,पक्षी, पिल्लांचा तरफडून बळी गेला. त्यामध्ये वटवाघळांचाही समावेश होता. ह्या सर्व मृत व जखमी चित्रबलाक पक्षी, पिल्ले व अंडी आणि सोबत वटवाघळांना एका ट्रॅक्टरच्या टेलर मध्ये भरून इंदापूर मधील कचरा डेपो मध्ये पुरण्यात आले यांचे नेमके कारण समजू शकलं नाही. आणि ह्या घटनेमुळे इंदापूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात तीव्र संतापाची लाट असून घाई गडबडीमध्ये सर्व चित्रबलाक पक्षी व पिल्लांना पुरण्यामध्ये नेमके गोडबंगाल काय ? याची इंदापूर मध्ये जोरदार चर्चा आहे. तसेच या घटनेबद्दल पक्षिप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
