स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १ / ६ / २० २३) :

शिक्षणातून समाज परिवर्तन समाज परिवर्तनातून संघर्ष संघर्षातून संघटन बांधणारा एक आदर्श समाज शिक्षक प्राध्यापक महादेव चव्हाण सर इंदापूर शहरामध्ये कसबा परिसरात एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेले प्राध्यापक महादेव मारुती चव्हाण यांनी समाजाला शैक्षणिक जीवनात काय करावे शिक्षक म्हणून काम करत असताना काय करावे आणि सेवानिवृत्तीनंतर घरी बसण्याऐवजी ,समाज हिताची कामे ,समाजसेवा, संघर्ष ,कसा करावा याचा एक धडा समाजासाठी घालून दिला .अत्यंत नकारात्मक परिस्थितीमध्ये एम ए बी एड हे शिक्षण पूर्ण करून आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. त्यातून समाज शिकला पाहिजे समाजामध्ये जागृती होऊन समाजामध्ये जीवन जगण्याची स्व: क्षमता प्रस्थापित झाली पाहिजे ,अशा भूमिकेतून त्यांनी मार्गक्रमण केले .बीएपर्यंतचे शिक्षण इंदापूर मध्ये झाले तरी एम ए मराठी विषयाचे शिक्षण पुणे विद्यापीठ मधून घेतलें. आपली परिस्थिती अत्यंत सामान्य होती, या सामान्य परिस्थितीमध्ये अत्यंत खडतर व आर्थिक दृष्ट्या नकारात्मक वातावरणात आपले शिक्षण पूर्ण झाले आहे ,म्हणून समाजामधील सर्वसामान्य ,गरीब ,कुटुंबातील मुले शिकली पाहिजेत ,ही भूमिका घेऊन चव्हाण सरांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पळसदेव येथील श्री.पळसनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज या ठिकाणी त्यांनी सेवेस आरंभ केला ,नंतर इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून सेवा सुरू केली .इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सराफवाडी,बिजवडी, कालठण ,या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले आयुष्यातील 26 वर्ष इतकी ज्ञानदानाची सेवा करून ते सेवानिवृत्त झाले .ज्या ज्या ठिकाणी ते ज्ञानदान करण्यासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या विषयातील शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले .100% निकालाची परंपरा आयुष्यभर जपली .त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना 2012 सली इंदापूर पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. 2013 साली सायन्स फाउंडेशन पुणे यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ,2014 ला ऍक्टिव्ह टीचर पुरस्कार औरंगाबाद या ठिकाणी मिळाला, त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये उत्कृष्ट व आदर्श शिक्षक म्हणून असंख्य पुरस्कार मिळाले .संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व सरांचे आदर्श कर्मयोगी शंकराव पाटील व तत्कालीन सचिव विठ्ठलराव गुंडेकर यांच्या कडूनही सरांचे अनेक वेळा कौतुक झाले. मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे व आपले विद्यार्थी सर्वांगाने सक्षम झाले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून सरांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व ,नाट्य, लेखन काव्य या क्षेत्रात मार्गदर्शन करून ,आपले विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकतील याची काळजी घेतली .मी मुख्यमंत्री झालो तर या नाटकाला पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्कार मिळाला .शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक ,नैतिक, क्षेत्रामध्ये माझा विद्यार्थी चमकला पाहिजे ,या भावनेतून विद्यार्थ्यांना चांगल्या संस्काराचे धडे देऊन, विद्यार्थी घडवले .सरांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात संपूर्ण देशात आणि जगभर आपले शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकत आहेत .या गोष्टीचे सरांना अत्यंत समाधान वाटत असून, स्वतःच्या प्रपंचाची काळजी न करता ,माझ्या विद्यार्थ्यांचे प्रपंच कसे उभा राहिले ,याच्या आनंदात ते सतत असतात. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडूनही सरांचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष पाटील हे नेहमी म्हणतात शिक्षक हा चव्हाण सरांसारखा असला पाहिजे. सर सेवानिवृत्त झाल्यानंतर घरामध्ये बसून राहिले नाही, त्यांना समाजाच्या गरजा, अडचणी, प्रश्न सतत दिसत असत. त्यामुळे त्यांचे मन बेचैन होत असे, म्हणून सरांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला. संस्थेच्या उपाध्यक्ष आणि कर्मयोगी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाने आणि सूचनेने ऊस तोडणी मजुरांचे प्रश्न हातामध्ये घेऊन गेली तीन वर्ष सर त्यांच्या प्रश्नावर ते सामाजिक कार्य करीत आहेत .प्रत्यक्षात ऊस तोडणी फडामध्ये , डॉक्टरांची आरोग्यवर्धक टीम घेऊन जाऊन त्या ठिकाणी मजुरांची तपासणी करणे ,मजुरांच्या मुलांची तपासणी करणे ,त्यांना काही त्रास असल्यास औषध उपचार करणे ,गंभीर आजार असल्यास शासकीय योजना शोधून त्याचे फायदे मिळवून देऊन ,यशस्वीपणे त्यांची ऑपरेशन व उपचार करणे. तसेच ऊस तोडणी मजुरांची मुले शिकली पाहिजेत म्हणून त्यांना शाळेत घालवण्याचा प्रयत्न करणे, त्या मुलांना योग्य प्रकारचे शिक्षण कशा प्रकारे मिळेल याचे मार्गदर्शन करणे, हे काम ते आणि त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, भारत बोराटे सर, हे करीत आहेत .ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी कोपींवरची शाळा सुरू केली. मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी अविरत कष्ट करून भारत बोराटे सर यांनी शाळा सुरू केले. सर्वांच्या मदतीने शाळा सुरू झाली. शिक्षणासाठी मदत करतात जगावेगळी आणि उपेक्षित माणसासाठी केले जाणारे त्यांचे समाजकार्य हे लोकांसाठी आदर्शवत आहे . अशा अनेक प्रकारची दुर्बल घटकांसाठी कार्य करून सर थांबत नाही. इंदापूर शहरांमध्ये सर्वधर्मसमभावाच्या विचाराची प्रस्थापना व्हावी या भूमिकेतून त्यांनी बाबांचा उरूस या उरूस समितीचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम कार्य करीत आहेत . उरुसाचा कार्यक्रम कशा पद्धतीने चांगला होईल व या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम ऐक्य कसे होईल यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्या साथीला आझाद पठाण, हमीदभाई आत्तार ,हे या उरूसासाठी खूप परिश्रम घेतात. इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर, सिद्धेश्वर , मंदिरात श्रावण महिन्यात विशेष कार्यक्रम असतात, त्यामध्येही सर सक्रिय सहभाग घेतात .इंदापूर शहरातील अति प्राचीन व शहरवासी यांचे आराध्य दैवत असलेले कासार पट्टा सातपुडा येथील श्रीकृष्ण मंदिरांमधील कृष्णजन्म अष्टमीच्या कार्यक्रमात गेली 35 वर्ष सतत सक्रिय असतात .इंदापूर शहराचे आराध्य दैवत ज्योतिबाच्या मंदिरात यात्रेमध्ये अग्रेसर राहून सक्रिय सेवा देतात. अनेक धार्मिक कामामध्ये सहभाग घेऊन शहराची सांस्कृतिक आनंद उत्सव वृद्धिंगत कसे होतील याची सर काळजी घेतात. सर मराठीचे प्राध्यापक होते. ते स्वतः उत्तम लेखक आहेत त्यांनी अनेक ग्रामीण कथा ,कविता, प्रवासवर्णने ,लिहिली असून त्यांचा देवमय हा कवितासंग्रह माझ्या शाळेच्या आठवणी, ईर्षा, हा कथासंग्रह रानमळा ग्रामीण कादंबरी, जावे त्याच्या गावा प्रवासवर्णन लिहिलेली आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली असून, अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहेत .लोक त्यांच्याकडे महाराष्ट्रातील नामवंत कवी लेखक म्हणून पाहत असतात .सर्वसामान्यांचे प्रश्न, निसर्ग वर्णने ,प्रवासवर्णने संस्कृती याचे दर्शन यातून होते. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन समाजसेवक अण्णा हजारे, छत्रपती उदयनराजे भोसले, नामवंत प्रसिद्ध लेखक मारुती चित्तमपल्ली, महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या साहित्या मधील कथा कथेतील पात्र ही वास्तव जीवनाशी समरस आहे. सरांना सर्वसामान्य गरीब ,दुर्बल, दारिद्र्यरेषेखालील घटकांबद्दल, अत्यंत कळवळ असून त्यांना गरीब माणसावरील अन्याय सहन होत नाही .लेखक आणि कवी मनाचे असलेले सर कोणावरती अन्याय झाला तर पेटून उठतात. इंदापूर शहरांमध्ये इंदापूरकर नागरिकांवरती नगरपालिकेने एक एप्रिल 2017 पासून 24 टक्के घरपट्टीवर व्याज आकारणे, लोकांच्या घरावर शास्ती बसवली, लोकांच्या घरकुलाचे हप्ते दिले गेले नाहीत ,घरकुलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर कचरा डेपो केला. हा कचरा डेपो ज्योतिबाच्या मंदिराशेजारी केला. गाळेधारकांवर अन्याय केला जातो आणि या सर्वाचा परिणाम इंदापूर शहराच्या विकासावर वाढीवर होतो .या अन्यायाविरुद्ध चिडून जाऊन शहरांमध्ये इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती स्थापन करून नगरपालिकेच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू केला गेली. 65 दिवस सर या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी व नागरिकांना न्याय देण्यासाठी लढत आहे. त्यांनी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री , आयुक्त ,जिल्हाधकारी, व समस्त इंदापूरकरांनी घेऊन, इंदापूरकर यांच्या पाठीशी उभा आहे .अशी चवंगी लढाई करणारे सर कुठल्याही स्वार्थाशिवाय अपेक्षेशिवाय लढाई करत असतात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राण पणाला लावतात. 44 अंशाच्या तापमानातही फाटक्या फाटक्या मंडपात बसून ते आपला संघर्ष करीत आहे .अशा संघर्ष गुरुचा एक जून रोजी वाढदिवस आहे. स्वतःच्या नावाचा जोगवा करणे, वाढदिवस साजरा करणे हे सरांना आवडत नाही. परंतु सरांना न सांगता मी त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना व्हावी व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांच्या वाटेवर इतरांनी चालावे, म्हणून मुद्दाम हा लेख लिहीत आहे. सरांना शंभर वर्षांपेक्षा जास्त आयुष्य लाभो त्यांची भरभराट हो, प्रगती हो, त्यांचा नावलौकिक कीर्ती संपन्नता वाढत राहो, त्यांची पत्नी मुले त्यांचे सर्व कुटुंब यांची प्रगती होत राहो, अशी प्रार्थना इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर व सिद्धेश्वराच्या चरणी करीत आहे.
शब्द संकलन
प्राध्यापक कृष्णा ताटे सर
सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार
