स्टार केबी न्यूज
सपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३० / ५ / २० २३) :
इंदापूर, ता. २९: आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा इंदापूर शहरामध्ये सोमवारी (ता. २९) सकाळी दाखल झाली. यावेळी हलगीच्या निनादात जोरदार घोषणाबाजी करत शहराच्या विविध भागातून फेरी काढीत महापुरुषांना अभिवादन करत यात्रा पुढे मार्गस्थ झाली.
आम आदमी पक्षास जनसामान्यापर्यंत पोचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांसाठी काम करणारे सर्वसामान्यांचे राज्य आणणे ही उद्दिष्टे घेऊन पंढरपूर येथून सुरू झालेली यात्रा सोमवारी सकाळी इंदापूरमध्ये दाखल झाली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत टेंभुर्णी नाका, नेहरू चौक, मुख्य बाजारपेठ, अहिल्यादेवी चौक, ते नगरपरिषद येथे आली. यावेळी नगर परिषदेच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आम आदमी पक्षाच्या विविध योजनांची माहिती देणारे पथनाट्य सादर करण्यात आले .
महाराष्ट्र राज्य प्रभारी गोपाल वेळी इटालिया, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे, पुणे पती जिल्हा अध्यक्ष मुकुंद कीर्दक, यांना जिल्हा सचिव अक्षय शिंदे एम.एम. दमी पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष क्षीरसागर, हती इंदापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष जनार्दन पांढरपिसे, हनुमंत वाघमोडे, आप्पा पाटील यांचेसह अन्य क्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान इंदापूर नगर परिषदेसमोर प्रा . कृष्णा ताटे सर यांचे नेतृत्त्वा खाली गेली ६४ दिवस झाले इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून स्वराज्य यात्रेतील आम आदमी पाटीचे सोलापूर अध्यक्ष . पाटील एम .एम .
नांदेड जिल्हाध्यक्ष क्षीरसागर साहेब यांनी
यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन संघर्ष समितीच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून संघर्ष समितीच्या मागण्या बाबत शासन दरबारी प्रश्न लावून धरणार असलेचे सांगून . या मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले. यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे सर सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, प्रदीप भाऊ पवार, लेखक महादेव चव्हाण सर, अशोक भाऊ ननावरे, संतोष भाऊ जामदार
