स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. २५ / ५ / २०२३ ) :

. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने पाणी घरपट्टीचे व्याज, पाणीपट्टीचे व्याज, घरकुले, गरिबाच्या घरावरील घनकचरा, या सत्तावीस प्रश्नावर सत्तावीस मार्च २०२३ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला आज २५ मे २०२३ रोजी साठ दिवस पूर्ण झाले यानिमित्ताने इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या धरणे आंदोलन मंडपा मध्ये संघर्ष समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून महाराष्ट्र शासन शासकीय कार्यालय नगरपालिका कार्यालय यांनी हवे त्या प्रकारे गेल्या 60 दिवसात आंदोलनाची नक्कल दखल न घेता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तरीसुद्धा इंदापूरकरांवर पिळवणुकीचे व्याज ,शासकीय दंड, घनकचरा, घरकुले ,असे प्रश्न व या प्रश्नाच्या आधारावर होणारी पिळवणूक यासाठी संघर्ष समिती तडीचे आंदोलन करीत आहे आज साठाव्या दिवशी
*साठी बुद्धी नाठी*

हे नाविन्यप्रकाराचे आंदोलन करून धरणेमंडपामध्ये प्रशासनाची खुर्ची प्रस्थापित केली या खुर्चीला शिवा ग्रुपचे अध्यक्ष माजी नगरसेवक अतुल शेटे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घातला जमलेल्या शेकडो नागरिकांनी मागण्याची निवेदनाची पत्रके हातात घेऊन त्या खुर्चीला वाहिली या खुर्चीला मुख्यमंत्र्याची खुर्ची प्रशासनाची खुर्ची प्रशासकाची खुर्ची मुख्याधिकाऱ्याची खुर्ची असे संबोधले आणि त्या खुर्चीला इंदापूरकरांचे प्रश्न ऐकवले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इंदापूर नगरपालिकेच्या दरवाजामध्ये नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून जेष्ठ नागरिक ८० वर्षाचे अर्जुन संभाजी शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प वाहून नगरपालिकेच्या दरवाज्याची प्रतिकात्मक पूजा करण्यात आली जमलेल्या नागरिकांनी त्या दरवाज्यावर पुष्प वाहिले त्यानंतर हे सर्व नागरिक इंदापूर नगरपालिकेत गेले नगरपालिकेमध्ये एका खुर्चीची प्रशासनात्मक दृष्ट्या स्थापना केली व ती खुर्ची सरकारची नगरपालिकेची खुर्ची आहे असे संबोधून सेवानिवृत्त मिलिट्री मॅन मेजर महादेव सोमवंशी यांच्या हस्ते त्या खुर्चीला पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर इंदापूर नगरपालिकेने नागरिकांची घरपट्टी वाढवण्यासाठी पंचवार्षिकेची तयारी सुरू केली आहे त्या पंचवार्षिकीला विरोध करण्यासाठी नगर नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्याचे प्रतिनिधी यांना निवेदन देऊन घरपट्टीचे व्याज पाणीपट्टीचे व्याज शासकीय दंड गाडी धारकाचे प्रश्न पाण्याचा प्रश्न गणपतीचा प्रश्न घरकुलाचा प्रश्न शासकीय जमिनीवर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या नावावर जागा व्हाव्यात हा प्रश्न हे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय व निवेदनातील २७ प्रश्न सुटल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पंचवार्षिकी किंवा घरपट्टी वाढ इंदापूर करावं लागू नये व लादल्यास त्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात लिहिण्यात आले त्यानंतर नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी जागेवरती जाऊन गुलाब पुष्प दिली गांधीगिरी करून नगरपालिकेच्या दरवाजामध्ये धरणे मंडपामध्ये व नगरपालिकेमध्ये पाच मिनिटे प्रत्येक ठिकाणी स्तब्ध उभे राहून आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका अशी मागणी केली यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये अन्याय व्याज व इतर प्रश्नाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला 60 दिवस झाले आमचा विचार केला नाही अशी भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली
