
42% च्या ही पुढे तापमान गेले. अक्षरशः सूर्य आग ओकत आहे. अश्याही स्थितीत तीनशे किलोमीटर चा टप्पा पूर्ण करत मराठा समाजाची वनवास यात्रा पुण्यात पोचणार आहे. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी तुळजापूर पासून मुंबई पर्यंत पायी चालत जाणारे हे आगळे वेगळे आंदोलन सद्ध्या महाराष्ट्रात सुरू आहे.

गोणपाटाचे वस्त्र परिधान करून, मराठा बांधव वाटचाल करत आहेत. प्रभू श्रीरामचंद्र यांना 14 वर्षेच वनवास भोगावा लागला. परंतु मराठा समाजाला गेली अनेक दशके आरक्षणाच्या बाबत वनवास भोगावा लागत आहे. तो वनवास मिटावा यासाठी ही वनवास यात्रा असल्याचे श्री योगेश केदार यांनी सांगितले.
वाटेत लागणाऱ्या गावोगावी सभा बैठका घेत आरक्षण म्हणजे नेमके काय? संविधान काय याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात देखील भव्य सभा घेतली जाणार असे प्रतापसिंह कांचन , सुनील नागणे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वरूप.
24 तारखेला रात्रीचा मुक्काम वानवडी येथील श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांच्या स्मारकाच्या ठिकाणी असेल.
25 तारखेला सकाळी 08 वाजता स्वारगेट मार्गे लाल महाल इथपर्यंत जनजागृती मिरवणूक होईल. तसेच लाल महाल याठिकाणी ठीक 10 वाजता सभा घेण्यात येईल. महाराष्ट्रातील फुगीर आरक्षण व मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण कसे मिळेल? याविषयी चे मार्गदर्शन केले जाईल.
जास्तीत जास्त समाज बांधवांनी या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
