स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २२ / ५ / २० २३) :

मा. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या रुग्णाला मदत मिळावी या हेतूने माननीय मंगेश जी चिवटे साहेब कक्ष प्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधी यांच्या माध्यमातून आज इंदापूर तालुक्यातील कृष्णा हॉस्पिटल मधील पेशंट महेंद्र पवार यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडून १ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या फाईलचा फॉलोअप स्वतः डॉक्टर अतुलजी वनवे यांनी घेतला. व स्वतः डॉक्टरांनी सांगितले की मंगेश चिवटे साहेब यांची जी तळमळ आहे ती खरच मनापासून आहे म्हणून आम्ही सुद्धा ठरवले आहे की प्रत्येक रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीचा फायदा कसा रुग्णांना देता येईल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू.

यावेळी पेशंट उपस्थित नसल्यामुळे डॉक्टर अतुलजी वनवे साहेब यांच्याकडे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे सोशल मीडिया प्रमुख भूषणजी सुर्वे तसेच इंदापूर शहर वैद्यकीय समन्वयक ॲडव्होकेट आनंद केकान, सोमनाथ लांडगे, सागर आवटे, सीमाताई कल्याणकर व तसेच वैद्यकीय चे पदाधिकारी या सर्वांच्या हस्ते लेटर डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात आले तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा मार्गदर्शन ग्रंथ यावेळी डॉक्टरांना भेट देण्यात आला.