स्टार केबी न्यूज
इंदापूर ( दि. १७ / ५ / २०२३ ) :

मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी तुळजापूर ते मुंबई असा जवळपास ५०० किलोमीटर चा पायी प्रवास करत ही वनवास यात्रा निघाली आहे. ०६मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी यात्रेचे प्रस्थान झाले. तसेच ०६ जून राज्याभिषेक सोहळ्या दिवशी मजल दर मजल करत ही यात्रा मुंबईवर धडकणार आहे. वनवास यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संविधान आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कसे देता येईल? याबाबत जनजागृती करत ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.

दि १७ मे रोजी ही वनवास यात्रा सोलापूर जिल्हातून सकाळी पुणे जिल्हात प्रवेश केला त्यावेळी यात्रेचे इंदापूर तालुक्यातील मराठा बाधवांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले त्या नंतर त्या दिवशीचा रात्रीचा मुक्काम सरडेवाडी येथे करून
दिनांक १७मे रोजी गलांडवाडी क्र .. १ येथील मुक्काम करुन पहाटे पुढे मार्गस्थ झाली व सकाळी ११ वा . लोणी देवकर या ठिकाणी आगमन झाले त्यावेळेस लोणी -देवकर गावचे सरपंच कालिदास देवकर , सहदेव डोगरे,युवा उद्योजक श्री . मंगेश डोंगरे, उमेश घाडगे , अंकुश घाडगे , विजय डोंगरे , दादा थोरवे , अभिजीत गायकवाड , अंकुश थोरात , लहु कानगुडे , संजय पवार तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थीत होते .
यावेळी महादेव मंदीरात सभा पार पडली त्यावेळी अखिल भारतीय मराठा सेवासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पवार , मंगेश डोंगरे , प्रतापसिह कांचन पाटील यांची भाषणे झाली तसेच या यात्रेचे आयोजक योगेश केदार यांनी उपस्थीतांना वनवास यात्रा व मराठा आरक्षणासंदर्भातची भूमिका मांडताना म्हणाले की
प्रभू श्रीराम यांना केवळ १४ वर्षेच वनवास भोगावा लागला परंतु देश स्वतंत्र झाला तेंव्हापासून मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत वनवास सुरू आहे. तो वनवास मिटावा यासाठी आम्ही मराठा वनवास यात्रा काढली आहे. ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत. असे वनवास यात्रेचे योगेश केदार यांनी सांगितले.
या यात्रेत आयोजक योगेश केदार यांच्यासह प्रतापसिंह कांचन पाटील, सुनील नागणे, तात्या महाराज लोमटे, राजेंद्र कमलाकर शिंदे, श्याम माळी, महेश केदार, रणजित भाकरे चव्हाण, विशाल सावंत, जयराज वडने, प्रशांत नागमोडे, बाळासाहेब माने, अण्णा शिंदे, तानाजी शिंदे, नितीन लोमटे, अमर मुळे, रोहन गवळी, व इतर सहकारी सहभागी आहेत
. यानंतर सर्व वनवासी यात्रेकरुंना मंगेश डोंगरे यांच्या शेतातील घरी उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था डोंगरे परिवारांकडून करण्यात आली होती तसेच दुपारची विश्रांती त्या ठिकाणी घेऊन पुढे पळसदेव मुक्कामाकडे मार्गस्थ झाली .
– – – – – – – – – – – –
टीप : – यावेळी अनेक ग्राम पंचायतींनी या वनवास यात्रेस व मराठा आरक्षणा संदर्भात पाठींब्याचे पत्र देत आहेत .
