स्टार केबी न्यूज
( दि. १६ / ५ / २० २३) :

पुणे : राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेची ओळख आहे. पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका अशी पुण्याची ओळख निर्माण झाली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्याचे विभाजन करा अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगेंनी केलीय. यासाठी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिलं आहे. पुणे जिल्ह्याचं विभागजन करुन नवीन जिल्ह्याचं नाव ‘शिवनेरी’ द्या ) अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
ठाणे हा राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघरजिल्हा अस्तित्वात आली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या विभागली गेली. सध्या राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्ह्यात पुणे पहिल्या क्रमांकवर, ठाणे जिल्हाय दुसऱ्या क्रमांकवर तर मुंबई उपनगर तिसऱ्या क्रमांकवर आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना असताना आमदार लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी केली. नव्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्या, आम्हाला त्याचा सर्वात जास्त अभिमान वाटेल, असं आमदार लांडगे यांनी म्हटलंय.
